"आजोबांप्रमाणे तुम्हाला बॉम्बने उडवून देईन…", काँग्रेस खासदाराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 08:00 PM2023-02-26T20:00:23+5:302023-02-26T20:00:47+5:30

खासदार रवनीत सिंग बिट्टू तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 1995 मध्ये हत्या झालेल्या बेअंत सिंग यांचे ते नातू आहेत.

"I'll bomb you like grandpa...", threatening to bomb a Congress MP | "आजोबांप्रमाणे तुम्हाला बॉम्बने उडवून देईन…", काँग्रेस खासदाराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

"आजोबांप्रमाणे तुम्हाला बॉम्बने उडवून देईन…", काँग्रेस खासदाराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

googlenewsNext

पंजाबमधील लुधियाना येथील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. खासदार रवनीत सिंग बिट्टू यांना बॉम्बने उडवून देईन, असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे. आरोपीने स्वत:ला वारिस पंजाब डे चीफ अमृतपाल सिंगसोबत असल्याचे सांगितले आहे. तसेच, खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या विरोधात बोलणे थांबवले नाही, तर तुमच्या आजोबांप्रमाणे तुम्हाला उडवून देईन, असे आरोपीने म्हटले आहे. दरम्यान, खासदार रवनीत सिंग बिट्टू तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 1995 मध्ये हत्या झालेल्या बेअंत सिंग यांचे ते नातू आहेत.

गुरुवारी अमृतपाल सिंगच्या समर्थकांनी बॅरिकेड्स तोडून अजनाळा येथील पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश केला. काहींच्या हातात तलवारी आणि बंदुका होत्या. हे समर्थक अमृतपालचा अटक करण्यात आलेला सहकारी लवप्रीत सिंग उर्फ ​​तुफान याच्या सुटकेची मागणी करत होते. अपहरणाचा आरोपी लवप्रीत शुक्रवारी तुरुंगातून बाहेर आला आहे.

लुधियानाचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी सांगितले की, त्यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने फोनवर धमकी दिली आहे. खासदार रवनीत सिंग बिट्टू सध्या छत्तीसगडमधील काँग्रेसच्या 85 व्या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. अमृतपाल सिंग यांच्याविरोधात बोलणे थांबवा, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे फोन करणाऱ्याने मला सांगितले असल्याचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी सांगितले.

धमकीची तक्रार दाखल
दुबईहून परतलेला अमृतपाल सिंग वारिस पंजाब डे संघटनेचा प्रमुख आहे. या संघटनेची स्थापना अभिनेता दीप सिद्धूने केली होती, ज्याचा गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. लुधियानाच्या घुमर मंडी पोलिस स्टेशनचे प्रभारी उपनिरीक्षक सतनाम सिंह भुल्लर यांनी सांगितले की, खासदार रवनीत सिंग बिट्टू यांना मिळालेल्या धमकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अशा धमक्यांना आपण घाबरत नसल्याचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी म्हणणे आहे.

Web Title: "I'll bomb you like grandpa...", threatening to bomb a Congress MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.