'मी ठीक आहे आई, वेळेवर जेवण खा'; उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुराचा भावनिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 06:31 PM2023-11-21T18:31:00+5:302023-11-21T18:31:29+5:30

गेल्या १० दिवसांपासून उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात कामगार अडकले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

'I'm fine mom, eat dinner on time'; An emotional message from a laborer trapped in the Uttarkashi tunnel | 'मी ठीक आहे आई, वेळेवर जेवण खा'; उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुराचा भावनिक संदेश

'मी ठीक आहे आई, वेळेवर जेवण खा'; उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुराचा भावनिक संदेश

गेल्या १० दिवसांपासून उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात कामगार अडकले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  आज या कामगारांशी संवाद झाला आहे, कामगारांनी पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आहे. मंगळवारी, सुरू असलेल्या बचाव कार्यात असलेल्या अधिकाऱ्यांनी ६ इंची पाईप लाईनद्वारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संभाषण करुन केले. या कामगारांपैकी एक असलेल्या जयदेवने त्याच्या सुपरवायझरला त्याचा संदेश रेकॉर्ड करण्यास सांगितला.

'सर्व ४१ जण सुखरूप परततील, कुणाला दुखापतही होणार नाही', आंतरराष्ट्रीय तज्ज्ञानं व्यक्त केला विश्वास

जयदेव बंगालीत म्हणाला, “कृपया रेकॉर्ड करा, मी माझ्या आईला काहीतरी सांगेन. आई, टेन्शन घेऊ नको आम्ही ठिक आहोत. आई, माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. प्लीज तू आणि बाबा वेळेवर जेव.” हा संदेश यावेळी कामगाराने रेकॉर्ड केला. कामगारांशी सतत चर्चा करून त्यांचे मनोबल उंचावले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संवादात अधिकाऱ्यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना काळजी करू नका, तुम्हा सर्वांना लवकरात लवकर बाहेर काढले जाईल, असे सांगितले.

दरम्यान, कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना काही संदेश द्यायचा आहे का, अशी विचारणा करण्यात आली. यावर जयदेव यांनी त्यांचे बोलणे रेकॉर्ड केले आहे. हे व्हॉइस रेकॉर्डिंग त्यांच्या घरच्यांना पाठवले जाईल. जयदेव व्यतिरिक्त इतर मजुरांनीही त्यांच्या कुटुंबियांना निरोप पाठवला आहे. यामध्ये त्याने सांगितले आहे की, तो बोगद्यात अडकला आहे, परंतु सर्वजण सुरक्षित आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही. सर्वांना लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दगडमातीचा ढिगारा कोसळून ४१ कामगार आत अडकून पडलेले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही तांत्रिक अडथळ्यांमुळे कामगारांची सुटका होण्याच्या मार्गात अडथळे येत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बोगदेविषयक तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी साइटवर अजून काही तांत्रिक मुद्दे आहेत, मात्र कामगारांना वाचवलं जात नाही तोपर्यंत ते कायम राहणार आहेत, असं सांगितलं आहे.  मात्र सर्व ४१ जण घरी पोहोचतील, तसेच कुणालाही साधी दुखापतही होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: 'I'm fine mom, eat dinner on time'; An emotional message from a laborer trapped in the Uttarkashi tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.