नवी दिल्ली - योगगुरु बाबा रामदेव यांना कोरोनावरील उपचारासंदर्भात केलेले विधान चांगलेच भोवणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) बाबा रामदेव (Ramdev baba) यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. (Indian Medical Association sent a legal notice to Ramdev baba over his statements against allopathy.)
रामदेव बाबा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, एलोपॅथी उपचारपद्धतीबद्दल त्यांना अविश्वासर्हता दर्शवली आहे. एलोपॅथी ही मूर्ख आणि लंगडे विज्ञान आहे. सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसीवीर इंजेक्शनही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटले होते.
कोरोनावरील उपचार पद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटीबॉयोटीक्सही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे कोविड 19 बाधित रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता, एलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी केलेल्या दाव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. तसेच, बाबा रामदेव यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणीही संघटनेच्यावतीने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.
याविरोधात आता आयएमएने रामदेव बाबांना कायदेशीर नोटीसच पाठविली आहे.