नाशिक : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे आणि घोटी येथील गावठी दारू निर्मितीच्या हातभट्ट्यांवर गुरुवारी (दि़२१) छापेमारी करून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ या प्रकरणी देवराम गंगाराम पारवे, अशोक कचरू पारवे (दोघे रा. कृष्णनगर), नंदू मेंगाळ, मोहन तांबडू भले (दोघे रा. बोरीचीवाडी) या चौघा संशयितांसह एका अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कृष्णनगर परिसरातील पारवेवाडी आणि घोटी येथील डोंगर-दऱ्यांमध्ये ही कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना दारणा नदीपात्रात अवैधरीत्या हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नदीपात्रातील हातभट्टीवर छापा टाकला. या ठिकाणी संशयित देवराम व अशोक पारवे हे गावठी दारू तयार करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे पाच हजार लिटर नवसागर मिश्रित रसायन, वीस लिटर गावठी दारू, पंचवीस ड्रम, पातेले असे साहित्य जप्त केले. याप्रकरणी वाडीवºहे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गुरुळे, हवालदार राजू दिवटे, बंडू ठाकरे, शिवाजी जुंदरे, पोलीस नाईक जालिंदर खराटे, शिपाई संदीप हांडगे, सचिन पिंगळे, लहू भावनाथ यांच्या पथकाने ही कारवाई केली़ घोटी पोलीस ठाणे हद्दीतील डोंगर दºयांमध्येही गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळगाव मोर शिवारातील मोराचा डोंगर पायथ्याशी छापा मारला. या ठिकाणी गावठी दारू बनवली जात समारे आले़ पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितासह दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १२ हजार ४०० लिटर नवसागर मिश्रित रसायन, ५० लिटर गावठी दारू, ६२ ड्रम असा ६ लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
इगतपुरी, वाडीव-हेतील हातभट्ट्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:26 AM