नवी दिल्ली : लोकांच्या समस्या तत्काळ ऐकून त्या सोडविल्या जातील असे चित्र एका महिन्याच्या आत दिसले पाहिजे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चपदस्थ सनदी नोकरशहांची हजेरी घेतली आहे. एखादी तक्रार नोंदविली गेल्यानंतर तिचे ६० दिवसांमध्ये निवारण झाले पाहिजे, असेही पंतप्रधानांनी या वेळी स्पष्ट केले.प्रगती (प्रोअॅक्टीव्ह गव्हर्नन्स अॅण्ड टाइमली इम्प्लिमेन्टेशन) या सरकारमधील विविध खात्यांमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारी आणि त्यांची वाटचाल याबाबत माहिती गोळा करून निरीक्षण करणाऱ्या उपक्रमाच्या बाबतीत पंतप्रधान अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्समधून संवाद साधत होते. पंतप्रधान कार्यालयास विविध आॅनलाइन माध्यमांतून सरकारी खात्यांमध्ये नोंदविलेल्या तक्रारींची दखल न घेणे व त्यावर पुढे अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.पंतप्रधान म्हणाले, तक्रारी सक्षमरीत्या हाताळणे हे मिनिमम गव्हर्न्मेंट, मॅक्सीमम गव्हर्नन्सचा प्रमुख घटक आहे. जमिनीच्या नोंदी ‘आधार’शी संलग्न करण्यासाठी वेगाने काम करण्यासाठीही प्रयत्न करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पंतप्रधानांनी मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार येथील रस्ते, रेल्वे, ऊर्जा, तेल प्रकल्पांचा आढावाही घेतला.
तक्रारींचे निवारण तत्काळ करा
By admin | Published: March 25, 2016 1:51 AM