नवी दिल्ली : श्रीमंत भारतीय नागरिकांनी त्यांचे नागरिकत्व सोडल्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली असून, हा सरकारच्या अपारदर्शक कर धोरणांचा आणि मनमानी कराचापरिणाम असू शकतो, असे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, भारत सोडणारे अनेक भारतीय उच्च कुशल आणि शिक्षित आहेत. देशात कुशल कामगार गरजेचे असताना भारतीयांनी देश सोडल्याने अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. राज्यसभेत सरकारने स्वत: दिलेल्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये २.१६ लाख भारतीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. २०११ मध्ये हे प्रमाण १,२३,००० होते. पारदर्शक कर धोरणे आणि मनमानी कर प्रशासनाचा हा परिणाम असू शकतो, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
कोणत्या वर्षी किती भारतीय परदेशात गेले?
तरुण जाताहेत कुठे? : तरुण, उद्योजक मोठ्या प्रमाणात सिंगापूर, दुबई, ब्रिटन आणि इतर देशांमध्ये जात आहेत. गेल्या तीन वर्षांत दहा लाख डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या भारतीयांनी देश सोडला.
मंत्री म्हणाले... : नागरिकत्व सोडण्याची किंवा घेण्याची कारणे वैयक्तिक आहेत. एक यशस्वी, संपन्न आणि प्रभावशाली प्रवासी ही भारतीय समुदायाची संपत्ती आहे, असे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग म्हणाले.