ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांना महत्त्वाची खाते, शिवराजसिंह चौहान यांनी केले खातेवाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 11:34 PM2020-07-13T23:34:25+5:302020-07-13T23:34:52+5:30
मंत्रिमंडळाच्या एप्रिलमध्ये करण्यात आलेल्या पहिल्या विस्तारात सिलावत आणि राजपूत यांचा समावेश करण्यात आला होता.
भोपाळ : मध्य प्रदेश मंत्रिमंडळाचा अकरा दिवसांपूर्वी विस्तार करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी नवीन मंत्र्यांना खातेवाटप केले. खातेवाटपात भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांना काही महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
सिधिंया यांचे निष्ठावंत तुलसी सिलावत यांच्याकडे जलसंसाधन खाते कायम ठेवत त्यांच्याकडे मत्स्य व्यवसाय विकास खातेही देण्यात आले आहे. गोविंद सिंह राजपूत यांना महसूल अािण परिवहन खाते देण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या एप्रिलमध्ये करण्यात आलेल्या पहिल्या विस्तारात सिलावत आणि राजपूत यांचा समावेश करण्यात आला होता. सिंधिया यांचे समर्थक डॉ. प्रभूराम चौधरी (आरोग्य, कुटुंब कल्याण), प्रद्मुम्न सिंह तोमर (ऊर्जा), महेंद्र सिंह सिसोदिया (पंचायत व ग्रामीण विकास), इमरत देवी यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.