महत्वाचे... संक्षिप्त बातम्या जोड
By admin | Published: September 10, 2015 4:46 PM
कृषी साहित्य चोरट्यांची टोळी सक्रिय
कृषी साहित्य चोरट्यांची टोळी सक्रियकुही : तालुक्यातील अनेक गावात कृषी साहित्य व जनावरे चोरीच्या घटना पुढे येत आहेत. रात्रीच्या सुमारास चोरटे शिवारातील कृषी साहित्य व बैल चोरून नेत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे....अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्षखापरखेडा : परिसरातील दहेगाव, पोटा, वलनी गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरातील तरुण व्यसनाधीनतेकडे आकर्षित होत आहे. सट्टापट्टी मोठ्या प्रमाणावर असून अवैधरीत्या दारू विक्री होत आहे....नाल्या तुंबल्याने आरोग्य धोक्यातनरखेड : शहरातील लोकवस्ती भागात असलेल्या सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्या असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. काही भागात घाणीमुळे दुर्गंधी पसरली असून बाजार परिसरातही नालीतील सांडपाणी रस्त्यावर दिसते. याकडे पालिकेने लक्ष पुरविणे गरजेचे आहे....संरक्षण भिंतीेचे बांधकाम करण्याची मागणीसावनेर : तालुक्यातील काही शासकीय तसेच खासगी शाळांना संरक्षण भिंत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या शाळांना संरक्षण भिंत बांधून विद्यार्थी तथा पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.