ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - सरत्या वर्षाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांनी संबोधित करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही नवीन घोषणा करत आहेत, सोबतच मोदींनी नोटाबंदी निर्णयावरच भाष्य केलं. यावेळी त्यांनी झालेले फायदे आणि निर्णय घेण्यामागची कारणं सांगितली. तसंच नवीन योजना सुरु करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या योजना -
देशातील अनेक गरिबांकडे आपलं स्वत:चं घर नाही, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन घर देण्यासाठी नवीन योजना आणल्या आहेत. 9 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 4 टक्के तर 12 लाखांच्या कर्जावर 3 टक्क्यांची सूट दिली जाणार - नरेंद्र मोदी.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गावांमध्ये 33 टक्के नवीन घरं बांधली जाणार
शेती नष्ट झाली असा प्रचार करणा-यांना शेतक-यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे.
जिल्हा सहकारी बँकांमधून खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज घेतलं असल्यास 60 दिवसांचं व्याज माफ करुन शेतक-यांच्या खात्यात जमा करणार आहे- नरेंद्र मोदी
आगामी तीन महिन्यात 3 कोटी किसान क्रेडिट कार्डचं रुपांतर Rupay कार्डमध्ये होणार, यामुळे कुठेही खरेदी - विक्री करणं सोपं होईल - नरेंद्र मोदी.
लघुउद्योगांसाठी 1 कोटीऐवजी 2 कोटींचं कर्ज मिळणार
भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातील साडे सात लाख रुपयांपर्यतच्या रकमेवर 8 टक्क्यांचा व्याजदर दिला जाईल, दर महिन्याला व्याजाचे पैसे ते घेऊ शकतात - नरेंद्र मोदी.
गर्भवती महिलांना केंद्राकडून 6 हजार रुपयांची मदत मिळणार, माता मृत्यू दर कमी करण्यासाठी गर्भवती महिलांना मदत