भारतीय स्टेट बँकेसह अन्य बँका आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देणार आहेत. लॉकडाऊनच्या मोरेटोरियम पिरिएड शिवाय हा दिलासा असणार असून गृहकर्ज (Home loan) पुनर्बांधणी करण्याचा विचार करण्यात येत आहे.
बँका ज्या पर्यायांवर विचार करत आहेत, त्यामध्ये काही महिन्यांच्या EMI वर मुभा देण्यात येणार आहे. तर काही ईएमआय पुढे ढकलण्याचाही विचार सुरु आहे. ही सुविधा अशा लोकांना मिळणार आहे ज्यांच्या नोकरीवर संकट आले आहे किंवा त्यांचा पगार कापण्यात आला आहे. एनबीटीच्या सुत्रांनुसार केव्ही कामत समिती रिटेल आणि होम लोन रिस्ट्रक्चरिंगकडे लक्ष देणार नाही. कोरोना संकटाने त्रस्त झालेल्या कर्जदारांच्या संख्येचा आधारावर बँका स्वत:च एक प्रस्ताव तयार करणार आहेत. जो पुढील महिन्यात त्या त्या बँकेच्या संचालक मंडळाकडे पाठविला जाणार आहे.
थकबाकीदार वाढू नयेत यासाठी बँका आपणहूनच कर्जाची पुनर्बांधणी करण्याच्या विचारात आहेत. कारण जर डिफॉल्टर वाढले तर एनपीए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असेट वाढणार आहे. याचा फटका बँकेला बसणार आहे. तसेच कर्ज वसुलीसाठी किंवा मालमत्ता जप्त करण्यासाठी ही वेळ चुकीची आहे. नेहमीच्या कामाकाजासाठी रिझर्व्ह बँकेने एखाद्या कर्जदाराला दिलासा देण्यासाठी दोन वर्षांचा अतिरिक्त कालावधी देण्याची सुविधा दिलेली आहे. मात्र, बँकांच्या म्हणण्यानुसार दोन वर्षांचा प्रदीर्घ मोरेटोरिअम देता येणार नाही.
लॉकडाऊनमध्ये आरबीआयने कर्जदारांना ईएमआय दिलासा देण्यास बँकांना सांगितले होते. यानुसार आधी तीन महिने आणि नंतर तीन महिने असे 31 ऑगस्टपर्यंत ईएमआय भरण्यापासून सूट देण्यात आली होती. आता बँका हा मोरेटोरिअम पिरिएड वाढविण्यास अनुत्सुक आहेत. यामुळे 31 ऑगस्टपासून हा दिलासा संपणार की पुन्हा सुरु होणार यावर संभ्रम आहे. यामुळे कर्जदार काळजीत आहेत.
बुडालेला हप्ता कधी द्यावा लागणार? तीन महिने हप्ता द्यावा लागणार नाही, याचा अर्थ असा नाही की ते पैसे माफ झाले. तर बँका तुमच्या लोनचे रिस्टक्चरिंग करणार आहेत. म्हणजेच जर तुमचे पाच वर्षांचे लोन असेल तर तुमच्या लोनचा कालावधी तीन महिन्यांनी वाढणार आहे. म्हणजेच पाच वर्षे तीन महिने असा कालावधी होण्याची शक्यता आहे. तसेच जर तुम्हाला हप्त्यामध्ये वाढ करून बुडालेला हप्ता फेडायचा असेल तर तोही पर्याय बँका देऊ शकतात.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न
Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता
BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग
बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी
सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार
हवामान बदल धोक्याचा; 'देवीसारखे जुने व्हायरस आयुष्यात परतणार', संशोधकांचा इशारा
शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार