महत्वाचे कॉलम न्यूज
By admin | Published: September 04, 2015 11:50 PM
प्रौढ नागरिक मंडळातर्फे शिक्षकांचा गौरव
प्रौढ नागरिक मंडळातर्फे शिक्षकांचा गौरवनाशिक : शिक्षकदिनानिमित्त प्रौढ नागरिक मित्र मंडळातर्फे तारा अनंत साळी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. डिसुझा कॉलनीत होणार्या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सूर्यनमस्कार प्रशिक्षणाचा समारोपनाशिक : संत वेणास्वामी मठ, नाशिक शाखेतर्फे सूर्यनमस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व विशद करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी नियमित सूर्यनमस्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले.स्वयंसेवकांना देणार ग्रीन कुंभाचे प्रशिक्षणनाशिक: सिंहस्थानिमित्त विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन भाविकांच्या मदतीसाठी समाजपयोगी काम करत असतात. भाविकांच्या मदती सोबतच पर्यावरणाचेही संतुलन राखले जावे यासाठी वुमन्स सोसायटीतर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे.शाही मार्ग - रहिवाशांना सार्वजनिक शौचास बंदीनाशिक : सिंहस्थ पर्वणी काळात शाही मार्गावर राहणार्या रहिवाशांना सार्वजनिक शौचावर बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन, नदीचे पावित्र्य, शाही मार्ग स्वच्छ रहावा असा यामागचा उद्देश आहे.साधुग्राममध्ये स्वाईन फ्लूचे सावटनाशिक : वातावरणातील बदलाचा परिणाम शहराप्रमाणे साधुग्रामवरदेखील झाल्याने तसेच साधुग्राममध्ये विविध भागातील भाविकांची संख्या यामुळे स्वाईन फ्लूची साथ पसरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शहरात पार्किंगच्या समस्येत वाढनाशिक :एमजी रोड तसेच द्वारका ते सारडा सर्कल परिसरात अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ झाली आहे. वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांच्या कागदपत्रांची छाननी करण्यापेक्षा वाहतूक समस्या सोडवण्यावर भर देणे अपेक्षित आहे.मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणीनाशिक : सिडको परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून रात्रीच्या वेळी वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागते. कुत्रे वाहनचालकांना अडथळा ठरत असून अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.पार्किंग केलेल्या वाहनांमुळे अडथळानाशिक : के.के.वाघ महाविद्यालय तसेच लोकमान्य हॉस्पिटलसमोर पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. संबंधित संस्थांमध्ये पार्किंगसाठी जागा असूनही बाहेर पार्किंग केली जात असल्याने वाहतुकदारांनी नाराजी व्यक्त केली.उड्डाणपुलाखाली गवताचे साम्राज्यनाशिक : सिंहस्थ पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र स्वच्छता राखण्याचा प्रयत्न सुरू असूनही मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली मात्र गवताचे साम्राज्य वाढले असून उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.शहरात औषध फवारणी करणे गरजेचेनाशिक : पावसाने दडी मारल्याने वातावरणात बदल झाला असून यामुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून शहरात औषध फवारणीची मागणी होत आहे. सार्वजनिक स्वच्छता गृहातदेखील स्वच्छता राखण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.जेलरोड परिसरात घाणीचे सम्राज्य कायमनाशिक : सिंहस्थ पर्वणी तोंडावर आली असूनसुध्दा जेलरोड तसेच टाकळी परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले असून शहराच्या ठरावीक भागातच स्वच्छता होत असल्याने नागरिकांनी नाराजी दर्शविली आहे.वाहनचालकांकडून वाहतूक लेनचे उल्लंघननाशिक : जुने सीबीएस आणि मेळा बसस्थानक परिसरात शहराकडून कॉलेजरोडकडे जाणार्या मार्गावर अनेक वाहनधारकांकडून ओव्हरटेक करण्यासाठी दुभाजक प्यांचे नियम पाळले जात नाही, तसेच वाहनवेगावर मर्यादा घालण्याची मागणी होत आहे.चेहडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवावीनाशिक : चेहडी परिसरात ठिकठिकाणी कचर्याचे साम्राज्य असून, डासांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मनपा सफाई कर्मचारी या परिसरात फिरकत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.