नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील २१ दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. स्वत:ला वाचवण्यासाठी, कुटुंबीयांना वाचवण्यासाठी आणि देशाला वाचवण्यासाठी पुढील २१ दिवस घरात राहा. बाहेर पडू नका, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं. परिस्थिती अतिशय आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत संपूर्ण देश एक म्हणून उभा आहे. २१ दिवसांचा कालावधी मोठा आहे. मात्र आपण निश्चितपणे कोरोनावर विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनच्या काळात नेमकं काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे या काळात सुरू आणि बंद राहणाऱ्या सेवा, कार्यालयं, आस्थापनांची माहिती आम्ही देत आहोत.
१. केंद्र सरकारची कार्यालये, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारी स्वायत्त कार्यालये आणि सार्वजनिक कंपन्या बंद राहतील.अपवाद - संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, ट्रेझरी, सार्वजनीक आवश्यकता (जसे - पेट्रोलियम, सीएनजी, एलपीजी,पीएनजी), आपत्ती व्यवस्थापन, वीज निर्मिती आणि वितरण युनिट्स, पोस्ट ऑफिसेस, राष्ट्रीय माहिती केंद्र आणि काही सूचना देण्यात आलेल्या संस्था.२. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नियंत्रणाखालील कार्यालये, त्यांच्या स्वायत्य संस्था आणि कंपन्या बंद राहतील. अपवाद- पोलीस, होमगार्ड्स, नागरी सुरक्षा, फायर अँड इमर्जंसी सर्व्हिसेस, आपत्त व्यवस्थापन आणि कारागृह- जिल्हा प्रशासन आणि ट्रेझरी- वीज, पाणी आणि सफाई- नगरपालिकेच्या संस्था - केवळ स्वच्छता आणि पाणी पुरवठ्या सारख्या आवश्यक सेवेसाठी.वरील कार्यालयांत कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम चालले तसेच इतर कार्यालयांची कामे केवळ घरूनच केली जातील.३. रुग्णालयं आणि त्यांच्याशी संबंधित सर्व आस्थापनं सुरू राहतील. यामध्ये त्यांच्या उत्पादन युनिट्स, वितरण व्यवस्थेचा (खासगी आणि सार्वजनिक क्षेत्र) समावेश असेल. या अंतर्गत डिस्पेन्सरीज, केमिस्ट, वैद्यकीय साहित्य विकणारी दुकानं, लॅब्स, क्लिनिक, नर्सिंग होम्स, रुग्णवाहिकांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी सुरूच राहतील. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या प्रवासालादेखील मुभा असेल.४. रेशन दुकान, किराणा मालाचे दुकान, फळे आणि भाजीपाला, दुध केंद्र, मटन आणि मासे यांची दुकाने, जनावरांचे खाद्य इत्यादीं दुकानांना या लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. बँक, इन्शुरन्स कार्यालय आणि एटीएम मशिन्सप्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाटेलिकम्युनिकेशन, इंटरनेट सेवा, आयटी आणि आयटी क्षेत्राशी संबंधित सेवा अत्यावश्यक), या सेवांनाही शक्य तो वर्क फ्रॉम होम सुविधा देण्यात आली आहे.अत्यावश्यक मालाची वाहतूक, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य तेही ई-कॉमर्स व्यवहारातूनपेट्रोल पंप, एलपीजी पेट्रोलियम सेवा, गॅस सिलेंडर रिटेल आणि स्टोअरेजविद्युत निर्मित्ती, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन सेवाकोल्ड स्टोअरेज आणि पाणीपुरवठा केंद्रखासगी सुरक्षा सेवातसेच वर्क फ्रॉम होम या सुविधेनं चालणाऱ्या इतर संस्थांनाही यातून वगळण्यात आले आहे. ५. औद्योगिक आस्थापनं सर्व बंद राहतील. मात्र यातून जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या आस्थापनांना वगळण्यात आलंय. काही आस्थापनांना सतत उद्यापन प्रक्रिया सुरू ठेवावी लागते. असे कारखाने राज्य सरकारच्या परवानगीनं सुरू राहू शकतात.६. विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतूक बंद करण्यात आलीय. मात्र अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहील. अग्निशमन, कायदा आणि सुव्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणांना यातून वगळण्यात आलंय.७. हॉस्पिटिलिटी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे अडकलेल्या पर्यटकांनी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी, आपत्कालीन सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वास्तव्य केलेल्या हॉटेल, होमस्टेज, लॉज, मॉटेल्स यांना यातून वगळण्यात आलंय. याशिवाय क्वॉरेंटाईनसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या हॉटेल्सदेखील यातून वगळण्यात आली आहेत.८. सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था, संशोधन केंद्र, कोचिंग क्लासेस बंद राहतील.९. सर्व प्रकारची प्रार्थनास्थळं बंद असतील. १०. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ नये.११. अंत्यविधीसाठी वीसपेक्षा अधिक लोकांनी जमा होऊ नये.