नितीन अग्रवाल नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कापला जाऊ शकतो. ७५ वर्षांच्या वर गेलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यास पक्ष नकार देऊ शकतो. शुक्र वारी होणाऱ्या या संसदीय बोर्डच्या बैठकीत हा निर्णय होऊ शकतो.सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालय होणाऱ्या या बैठकीत राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आणायचे की बाहेर ठेवायचे यावर निर्णय होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या आधी हा निर्णय घ्यायचा आहे की विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना उमेदवार बनवावे की नाही.अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे की, जिंकण्याची शक्यता हाच उमेदवार निवडीचा निकष असेल. जास्त वयाच्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणे पक्ष टाळू शकतो. असे झाले तर लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, भगत सिंह कोश्यारी, भुवन चंद खंडुरी, शांता कुमार, हुकुमदेव नारायण यादव, बिजया चक्र वर्ती, करिया मुंडा आदी नेत्यांचा पत्ता कापला जाणे निश्चित आहे.
भाजपा संसदीय बोर्डाची आज महत्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 5:07 AM