(महत्त्वाचे) परळी केंद्रातील वीज निर्मिती ठप्प !
By admin | Published: July 08, 2015 11:45 PM
पाणी टंचाईचा फटका : १,१३० मेगावॅट उर्जेचा तुटवडा जाणवणारपरळी (जि. बीड) : पावसाअभावी राज्यात एकीकडे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असताना बुधवारी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीज निर्मिती पाण्याअभावी ठप्प झाली आहे. खडका धरणात पुरेसे पाणी नसल्याने येथील पाचवा संचही बुधवारी बंद झाला. त्यामुळे आता १,१३० मेगावॅट उर्जेचा तुटवडा जाणवणार ...
पाणी टंचाईचा फटका : १,१३० मेगावॅट उर्जेचा तुटवडा जाणवणारपरळी (जि. बीड) : पावसाअभावी राज्यात एकीकडे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असताना बुधवारी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीज निर्मिती पाण्याअभावी ठप्प झाली आहे. खडका धरणात पुरेसे पाणी नसल्याने येथील पाचवा संचही बुधवारी बंद झाला. त्यामुळे आता १,१३० मेगावॅट उर्जेचा तुटवडा जाणवणार आहे.परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील खडका धरणातून परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा केला जातो. मात्र धरणात पाणीसाठा नसल्याने केंद्रातील सर्वच संच टप्प्याटप्प्याने बंद करावे लागले. सोमवारी सकाळी संच क्र. ५ बंद ठेवण्यात आला. रविवारी संच क्र. ४ बंद झाला, तर ५ जून रोजी संच क्र. ६ व दीड महिन्यांपूर्वीच पाण्याच्या समस्येमुळे संच क्र. ३ बंद केलेला आहे. बुधवारी सकाळी २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ७ सुद्धा बंद झाला. दोन वर्षांपूर्वी पाण्याअभावी परळी केंद्रातील सर्वच संच बंद ठेवावे लागले होते. आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास सर्व संच पुन्हा सुरु होऊ शकतात, असे केंद्राचे मुख्य अभियंता आर.बी. गोहणे यांनी सांगितले.अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील ४०० के.व्ही. उपकेंद्रावर आता भार वाढला आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रात तयार होणारी वीज महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या गिरवली उपकेंद्रावरुन बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांना पुरवली जाते. आता या जिल्ह्यांत गिरवली उपकेंद्रातून चंद्रपूर व पॉवरग्रीडहून मिळणारी वीज पुरविली जाईल. (प्रतिनिधी)