शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

‘तेजस’ विमानाचे युद्धनौकेवर यशस्वी ‘लॅण्डिंग’ स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 3:21 AM

प्रगत तंत्रज्ञान भारताने आत्मसात केल्याचे झाले सिद्ध

नवी दिल्ली : पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘तेजस’ या वजनाने हलक्या लढाऊ विमानाने शनिवारी सकाळी नौदलाच्या ‘विक्रमादित्य’ विमानवाहू युद्धनौकेवर अलगद उतरण्याची आणि पुन्हा तेथूनच उड्डाण करण्याची पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली.

अरबी समुद्रात असलेल्या ‘विक्रमादित्य’ विमानवाहू युद्धनौकेवर ‘तेजस’ विमानाचे पहिले ‘अ‍ॅरेस्टेड लॅण्डिंग’ फत्ते करण्याची कामगिरी नौदलाचे अनुभवी वैमानिक कमोडेर जयदीप मावळंकर यांनी पार पाडली. डीआरडीओने तेजस लढाऊ विमान विकसित केले आहे. हवाई दलाच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेली अशी विमाने लवकरच तिथे दाखल होतील. त्यानंतर ‘तेजस’ची नौदल आवृत्ती तयार करण्यात आली. गोव्यातील किनारपट्टीवर असलेल्या चाचणी आस्थापनेत हे विमान प्रथमच भर समुद्रातून मार्गक्रमण करणाऱ्या युद्धनौकेवर उतरविण्यात आले.

नौदलाने या घटनेचे महत्त्व विशद करताना टष्ट्वीटमध्ये नमूद केले की, युद्धनौकेवर वापरता येईल असे लढाऊ विमान विकसित करण्याचे प्रगत तंत्रज्ञान भारताने आत्मसात केल्याचे यामुळे सिद्ध झाले. आता खास नौदलासाठी लागणाºया अशा विमानांचे उत्पादन करण्याचा मार्ग प्रशस्त होईल. विक्रमादित्य विमानवाहू युद्धनौकेची ३० लढाऊ विमाने वापरण्याची क्षमता असून, तेथे सध्या ‘मिग-२९’च्या नौदल आवृत्तीची विमाने तैनात आहेत. कालांतराने देशी ‘तेजस’ विमाने त्यांची जागा घेऊ शकतील. अन्य युद्धनौकांसाठी भारताला अशा ५९ विमानांची आवश्यकता आहे.

जमिनीवर उतरण्यापेक्षा युद्धनौकेवर विमान उतरविणे अधिक जिकिरीचे असते. कारण तेथे धावपट्टी अत्यंत आखूड असते. त्यामुळे प्रचंड वेगाने आलेले विमान खाली उतरले की, काही मीटर अंतरातच ते पूर्णपणे थांबवून उभे करावे लागते. युद्धनौकेवर अशा प्रकारे विमान उतरविण्यास ‘अ‍ॅरेस्टेट लॅण्डिंग’ म्हणतात. ते करताना विमानाचे अचूक तंत्रज्ञान व वैमानिकाचे कसब यांचा कस लागतो.संरक्षणमंत्र्यांकडून अभिनंदनसंरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या कामगिरीबद्दल ‘डीआरडीओ’ व नौदलाचे अभिनंदन केले. स्वदेशी लढाऊ विमान विकसित करण्याच्या भारताच्या वाटचालीतील हा एक महान क्षण आहे, असे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलDefenceसंरक्षण विभाग