नवी दिल्ली : ब्लू व्हेल चॅलेंजसारखे आॅनलाइन खेळ हे अॅपवर आधारित नसल्यामुळे त्यांना बंद (ब्लॉक) करणे शक्य नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.ब्लू व्हेलसारख्या संभाव्य जीवघेऊ खेळाबद्दल मुलांमध्ये जागृती करावी, असे आदेश राज्य सरकारांना याआधीही न्यायालयाने दिले होते. अशा खेळांच्या धोक्यांविषयी शाळकरी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांना सांगितले.सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अशा खेळांचे वाईट परिणाम काय आहेत याची माहिती देशातील सगळ्या शाळांना देण्याचे आदेश केंद्राला दिले.
ब्लू व्हेल ब्लॉक करणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 4:07 AM