सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 17 : उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथे दलित व दलितेतर समाजात पसरलेला तणाव, हरयाणात रोहतक येथे दलित महिलेवरील बलात्कार, महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा गावात अलीकडेच घडलेल्या काही अप्रिय घटना यामुळे दलित समाज व अन्य समाजात दुर्देवाने तणाव पसरला आहे. कोणतेही गाव सर्वांचे असते. दलितांसह विशिष्ठ समुदायाच्या मिरवणुका तिथे रोखणे अन्यायकारक आहे. अशा घटनांमधून विव्देष पसरतो. तो त्वरित दूर व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांशी मी बोललो असून मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी व राज्यांच्या गृहमंत्र्याशीही मी स्वत: बोलणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शास्त्री भवनात पत्रपरिषदेत केले.देशातल्या प्रत्येक राज्यात ज्या जिल्ह्यांमधे दलितांवर अत्याचाराचे प्रयोग वारंवार मोठया संख्येने होतात, अशा जिल्ह्यात तणावांच्या बंदोबस्तासाठी तसेच त्वरीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांबरोबरच अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख हे नवे पद निर्माण करावे, म्हणजे दलितांना सुरक्षितपणे जगण्यासाठी आश्वस्थ तरी होता येईल. असे नमूद करीत आठवले म्हणाले, दलित व महिला यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांमधे सध्या वाढ झाली आहे. समाजस्वास्थ्य व देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिने ही बाब चांगली नाही. हरयाणात ज्या महिलेवर बलात्कार झाला ती मूळ पानिपतची रहाणारी असून रोजगारासाठी रोहतक येथे जाते. बलात्कारासारखे अत्याचार जर राजरोसपणे होत असतील तर सामान्य व गरीब जनतेने पोटासाठी काम कुठे आणि कसे करावे, असा प्रश्न निर्माण होतो. देशात बलात्कारासारख्या गुन्ह्यांबाबत निर्भया प्रकरणानंतर अत्यंत कडक कायदा संसदेने मंजूर केला. त्यानंतरही असे प्रकार बेधडक घडत असतील तर परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे, हे मान्य करावे लागेल. सहारणपुरात अलीकडेच आंबेडकर जयंती आणि राणाप्रताप जयंतीच्या मिरवणुका रोखण्याचा दुर्देवी प्रकार घडला. तेव्हापासून दोन समुदायांमधे तिथे प्रचंड तणाव आहे. तो दूर झाला नाही तर त्यात त्वरेने लक्ष घाला, अशी विनंती मी मुख्यमंत्री योगींनाच करणार आहे.आठवलेंवर पत्रपरिषदेत अनेक प्रश्नांचा भडिमार झाला. देशात अल्पसंख्य आणि दलित अत्याचाराच्या घटनांमधे खरोखर वाढ झाली असेल, तर तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारी सोहळे आयोजित करण्यात कितपत औचित्य आहे? मुख्यमंत्रिपदी योगी विराजमान झाल्यापासून उत्तरप्रदेशात अल्पसंख्य भेदरलेले आहेत व दलित अत्याचाराच्या घटनांमधे वाढ झाली, हा आरोप खरा आहे काय? असे थेट प्रश्न विचारता आठवले म्हणाले, सहारणपूर तणावाबद्दल योगींना जबाबदार धरणे अयोग्य आहे. दलित अत्याचाराच्या गुन्ह्यांमधे उत्तरप्रदेश देशात सतत पहिल्या क्रमांकावर आहे. अखिलेश सरकार सत्तेवर असतांनाही हीच स्थिती होती. या यादीत बिहार दुसऱ्या, राजस्थान तिसऱ्या आणि महाराष्ट्र ८ व्या क्रमांकावर आहे. अत्याचारांचे प्रमाण सर्वत्र खाली यावे, हीच माझ्या पक्षाची
फुटकळ कारणांवरून दलितांवर होणारे अत्याचार त्वरित रोखावेत : रामदास आठवले
By admin | Published: May 17, 2017 8:40 PM