सुधारित-ॲम्ब्युलन्स घोटाळा
By admin | Published: August 28, 2015 11:37 PM
गहलोत, पायलट यांच्याविरुद्ध सीबीआयने नोंदविला गुन्हा
गहलोत, पायलट यांच्याविरुद्ध सीबीआयने नोंदविला गुन्हाराजस्थान: ॲम्ब्युलन्स घोटाळ्याच्या तपासाची सूत्रे स्वीकारलीनवी दिल्ली: राजस्थानातील ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी आपल्या हाती घेतला. याप्रकरणी राज्य पोलिसांनी माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत,काँग्रेस नेते सचिन पायलट आणि दोन माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांवर यापूर्वीच गुन्हा नोंदविला होता. तपास संस्थेने पुन्हा एकदा ही औपचारिकता पूर्ण केली.सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र व राज्य सरकारतर्फे अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर तपास संस्थेने ही जबाबदारी स्वीकारली. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गेल्या वर्षीच या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. भाजपाचे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर लगेच पोलिसांनी गेल्या वर्षी जून महिन्यात नोंदविलेल्या एफआयआरमध्ये गहलोत, पायलट, रवि कृष्ण आणि कार्ती चिदंबरम यांना आरोपी केले होते. रवि कृष्ण हे माजी केंद्रीय मंत्री वायलर रवी यांचे तर कार्ती चिदंबरम हे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आहेत.सीबीआयने एका खासगी कंपनीचे संचालक आणि अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा नोंदविला असून मुंबई व जयपूरमधील कंपनीच्या परिसरात धाडीही घातल्या.(वृत्तसंस्था)कारवाई राजकीय द्वेषभावनेतून गहलोत,पायलट यांचा आरोपदरम्यान राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत या दोघांनीही सीबीआयची ही कारवाई द्वेषभावनेतून करण्यात आली असल्याचा आरोप केला.मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र दुष्यंत यांच्या विरोधातील आरोपांचीही सीबीआय चौकशी होणार काय, असा सवाल गहलोत यांनी केला तर या प्रकरणाची चौकशी बऱ्याच काळापासून सुरू होती. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. याप्रकरणात मला विनाकारण गोवण्यात आले असून सीबीआयचा तपास वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होईल,अशी अपेक्षा पायलट यांनी व्यक्त केली. राजे सरकारच्या इशाऱ्यावरूनच सीबीआयची कारवाई करण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला.