सुधारित इंद्राणी साइड स्टोरी
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM
थंड डोक्याने खून करणारी इंद्राणी मुखर्जी सोशल मीडियावर सक्रिय
थंड डोक्याने खून करणारी इंद्राणी मुखर्जी सोशल मीडियावर सक्रिय--------डिप्पी वांकाणीमुंबई : इंद्राणी मुखर्जी यांच्या जगण्याबद्दल सोशल मीडियात डोकावले तर ही बाई अतिशय थंड डोक्याने खून करणारी असू शकते यावर विश्वास बसणार नाही. उलट तिला पाटर्य़ा झोडणे व तंदुरुस्त राहून जगभर प्रवास करायला आवडतो, असे दिसेल. इंद्राणीचा पती पीटरने अगदी मोजक्या वेळाच ट्विटरचा वापर केला व तो सोशल मीडियावर सक्रियदेखील नाही. परंतु इंद्राणीला सणासुदीच्या दिवसांतील, प्रवासातील व विशेषत: आपल्या मुलीसोबतची छायाचित्रे पोस्ट करायला आवडते. इंद्राणीची तिच्या मुलीसोबतची छायाचित्रे पाहून तिच्या मित्रांनी ती दिवसेंदिवस तरूण होत असून आता ती तिच्या मुलीची बहीणच वाटते, अशी प्रतिक्रिया पाठविली. यावर्षी जुलैपर्यंत इंद्राणी सोशल मीडियावर एवढी सक्रिय होती की ते पाहून तिने आपल्या बहिणीच्या खुनाचा प्रत्यक्ष आदेश दिला होता, असे कोणालाही वाटणार नाही. इंद्राणी मुखर्जी हिच्यावर शीनाच्या खुनाचा आरोप होता व तिला अटकही झाली होती. या शीनाचे लिंकएडइनवरील एकमेव अकाऊंट वगळता सोशल मिडियावर अकाऊंट नव्हते व लिंकएडइनवरील खाते 2011 पासून अपडेटही केलेले नव्हते.इंद्राणी मुखर्जीने 2012 मध्ये शीनाच्या खुनाचा आदेश तिच्या ड्रायव्हरला दिल्याचा आरोप आहे. तेव्हापासून इंद्राणी केवळ जगभरच फिरत नसून तिच्या फेसबुक प्रोफाईलवर नियमितपणे छायाचित्रेही पोस्ट करीत आहे. तिने दिवाळीत सजवलेल्या घराची छायाचित्रे जशी सोशल मिडियावर पोस्ट केली त्याच उत्साहात तिने नूतन वर्षात लुटलेल्या सुट्यांच्या आनंदाची छायाचित्रेही पोस्ट केली. 31 डिसेंबर 2014 रोजी इंद्राणीने तिच्या फेसबुक फ्रेंडस्ला खालील शब्दांत शुभेच्छा दिल्या होत्या :हाय ऑल, वर्षअखेर किती आनंददायी होते आणि 2015 वर्ष किती अद्भूत आहे. सरलेले वर्ष किती धावपळीचे होते तरीही ते प्रवास, मुक्काम, कुटंबीय व मित्रांसोबत वेळ घालविणे, आरोग्यदायी खाणे असा संमिर्श आनंद लुटता येईल असे होते. वजन कमी करणे अशक्य ठरले तरीही हे संपूर्ण वर्ष तसे छान गेले. तुमचेही 2014 हे वर्ष चांगले गेले असेल अशी मला आशा आहे. नवीन वर्ष सुरक्षित, आरोग्यदायी व आनंदी असेल व गेल्यावर्षी आपण जेवढे एकमेकांना भेटलो त्यापेक्षा 2015 मध्ये जास्तवेळा भेटू अशी मी शुभेच्छा व्यक्त करते. आम्ही ज्या आनंदात दिवस घालविले त्याच्या घेतलेल्या छायाचित्रांचा कोलाज पीटरने केला असून तो तुम्हाला दाखवावा हा विचार केला.प्रेमपुर्वकविधी, पीटर आणि मी---------इंद्राणीने शेवटचे छायाचित्र पोस्ट केले ते 16 जुलै रोजी. तिच्या या छायाचित्राला तिच्या मित्रांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या सगळ्य़ांना तिने उत्तरे पाठविली. स्वत:च्या तरूण दिसण्याचे र्शेय तिने कच्चे अन्न खाण्याला दिले आहे. इंद्राणीने गोवा, स्पेन आणि इतर ठिकाणी सुट्यांचा आनंद लुटला व तेथील छायाचित्रे तिने पोस्ट केली.बॉक्स------मृत शीना बोरा हिच्या ऑनलाईन पाऊलखुणा आहेत त्या लिंकएडइन या व्यावसायिक नेटवर्किंग वेबसाईटवर. शीना जुलै 2011 पासून मुंबईत रिलायन्स एडीएजीत असिस्टंट मॅनेजर (ह्यूमन रिसोर्सेस) म्हणून काम करीत असल्याचे तिचे प्रोफाईल सांगते. तेव्हापासून प्रोफाईलवर कोणतीही घटना घडलेली नाही. प्रोफाईलवरून असे दिसते की 2009 ते 2011 या कालावधीत शीना रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या ट्रेनिंग अँड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटमध्ये शिकाऊ उमेदवार होती. बोराने सेंट झेवियर कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी. ए. केले.------------