शहरं
Join us  
Trending Stories
1
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
2
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
3
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
4
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
6
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
7
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
8
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
9
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
10
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
11
इस्राइलविरोधात मुस्लिम समुदाय आक्रमक, देशातील अनेक भागात निदर्शने, नसरल्लाहचा शहीद म्हणून केला उल्लेख 
12
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
13
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
14
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
15
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
16
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
17
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
18
“चारवेळा CM असताना शरद पवारांना आरक्षणाचा मुद्दा का आठवला नाही”; शिंदे गटातील नेत्याचा सवाल
19
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
20
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?

सुधारित पान १- संघ-भाजपा

By admin | Published: September 04, 2015 10:45 PM

मोदी सरकारला रा.स्व.संघाचे प्रशस्तीपत्रकामकाज उत्तम : गंगा अभियानावर मात्र नाराजीसुरेश भटेवरानवी दिल्ली : सर्व क्षेत्रात मोदी सरकारचे कामकाज उत्तम प्रकारे चालले आहे. जनतेच्या या सरकारकडून मात्र खूपच अपेक्षा आहेत. अवघ्या १४ महिन्यांपूर्वी भाजपा केंद्रात सत्तेवर आली. अजून बराच काळ हातात आहे. या कालखंडात जनतेच्या अपेक्षा हे सरकार जरूर पुर्‍या करील, ...


मोदी सरकारला रा.स्व.संघाचे प्रशस्तीपत्र
कामकाज उत्तम : गंगा अभियानावर मात्र नाराजी
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : सर्व क्षेत्रात मोदी सरकारचे कामकाज उत्तम प्रकारे चालले आहे. जनतेच्या या सरकारकडून मात्र खूपच अपेक्षा आहेत. अवघ्या १४ महिन्यांपूर्वी भाजपा केंद्रात सत्तेवर आली. अजून बराच काळ हातात आहे. या कालखंडात जनतेच्या अपेक्षा हे सरकार जरूर पुर्‍या करील, संघाला याची खात्री वाटते, अशी ग्वाही रा.स्व. संघाचे सरसहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी समन्वय बैठकीच्या समारोपाआधी भवनासमोरील खुल्या मैदानात रणरणत्या उन्हात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. संघातर्फे मोदी सरकारला मिळालेले हे खुले प्रशस्तीपत्रच आहे.
भाजपा आणि रा.स्व. संघाच्या समन्वय बैठकीचा शुक्रवारी तिसरा व अंतिम दिवस होता. वसंत कुंज येथील मध्यांचल भवनात बैठकीच्या अंतिम टप्प्यात दुपारी ४.३0 वाजता पंतप्रधान मोदींचे आगमन झाले. बैठकीत त्यांची नेमकी भूमिका काय ? संघ कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत की नाहीत, पंतप्रधानांकडून संघाच्या नेमक्या अपेक्षा तरी काय?याबाबत कोणतीही माहिती उपस्थितीत पत्रकारांना होसबळे यांनी दिली नाही.
१२ केंद्रीय मंत्र्यांनी संघाच्या बैठकीत जवळपास पूर्णवेळ हजेरी लावली. त्यावर विरोधी पक्षांनी गेले दोन दिवस टीकेची झोड उठवली होती. या संदर्भात एका प्रश्नाला उत्तर देतांना होसबळे म्हणाले, रिमोट कंट्रोलवर चालणार्‍या काँग्रेस पक्षाने रा.स्व.संघाला कोणतेही सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. वर्षातून दोनदा होणारी संघाची बैठक वैचारिक आदान प्रदानासाठी असते. संघाची पार्श्वभूमी असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी त्यात भाग घेतला आणि सरकारची भूमिका संघ कार्यकर्त्यांना समजावून सांगितली, त्यांच्या शंकांना उत्तरे दिली तर त्यात काय बिघडले? या बैठकीव्दारे मोदी सरकारला संघाने कोणताही अजेंडा दिलेला नाही.
बैठकीतील चर्चेविषयी बोलतांना होसबळे म्हणााले, देशभर खेड्यातून शहरांकडे ग्रामीण जनतेचे स्थलांतर व पलायन सुरू आहे. ते त्वरित थांबावे यासाठी गावागावात कमाई, पढाई आणि दवाई (रोजगार, शिक्षण व आरोग्याच्या सोयी) उपलब्ध झाल्या पाहिजेत. देशात शिक्षणाचे व्यापक बाजारीकरण झाले आहे, त्याऐवजी त्याचे भाारतीयकरण झाले पाहिजे, अशा अपेक्षा व्यक्त करीत होसबळे म्हणाले, महागड्या शिक्षण व्यवस्थेवर समन्वय बैठकीत चिंता व्यक्त झाली. ही बैठक सरकारच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी नव्हती तर त्या बैठकीत आम्ही देशाच्या विकासासंबंधी वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा केली, असेही त्यांनी सांगितले.
--------
बॉक्स-

तिसर्‍या दिवशी गंगा सफाई अभियानाविषयी उमा भाारतींनी सरकारी योजनेचे प्रेझेंटेशन दिले त्यात कालबद्ध योजनेचा अभाव असल्याने संघाने निराशा व्यक्त केली, अशी माहिती संघाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली.
-----------------
कोट-
--------
राम जन्मभूमीवर मंदिर उभारायला हवे, मात्र हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत मी आत्ताच काहीही बोलू शकत नाही.
- दत्तात्रय होसबळे, सरसहकार्यवाह, रा.स्व. संघ