सुधारित.......युवतीची जीभ कापली नांदुर्याची घटना: अज्ञात युवकाने केला अघोरी प्रकार
By admin | Published: August 10, 2015 11:28 PM
नांदुरा (बुलडाणा): नांदुरा खुर्द येथील एका १७ वर्षीय युवतीची एका अज्ञात युवकाने घरात घुसुन जीभ कापल्याची घटना सोमवारी घडली. जखमी युवतीवर अकोल्यात उपचार सुरू असून, घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
नांदुरा (बुलडाणा): नांदुरा खुर्द येथील एका १७ वर्षीय युवतीची एका अज्ञात युवकाने घरात घुसुन जीभ कापल्याची घटना सोमवारी घडली. जखमी युवतीवर अकोल्यात उपचार सुरू असून, घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. नांदुरा खुर्द येथील नदीकाठावर असलेल्या साळीपुरा भागात रेणुका खानंदे ही तिची आई यशोदाबाई श्रावण खानंदे हीच्यासोबत आजीच्या घरी राहते. सोमवारी रेणुकाची आई मजुरीसाठी शेतात गेली होती. घटनेच्यावेळी मुलीची आजीही घरी नव्हती. घरी रेणुका एकटीच असल्याचे पाहुन एक अनोळखी युवक तोंडाला काळा रुमाल बांधुन घरात घुसला. त्याने दरवाजा बंद करुन रेणुकाचे तोंड दाबले आणि तिची जीभ बाहेर ओढून कापली. हा अघोरी प्रकार केल्यानंतर युवकाने लगेच नदीच्या दिशेने पळ काढला. रेणुकाची आजी घरी आल्यानंतर तिला हा अघोरी प्रकार समजला. रेणुकाला लगेचच उपचारासाठी खामगाव येथे आणण्यात आले. तिथे प्रथमोपचार करुन तिला अकोला येथे हलविण्यात आले. रेणूकावर अकोल्यात उपचार सुरू असून, याप्रकरणी वृत्त लिहेपर्यंत पोलिस स्टेशनला कोणतीही तक्रार दाखल नव्हती. यासंदर्भात नांदुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्याशी रात्री संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना मुलीच्या घरी पाठविण्यात आले होते; परंतु घरी कुणीही नसल्याने घटनेचे कारण किंवा आरोपीबाबतची माहिती समजू शकली नाही. मुलीवर अकोल्यात उपचार सुरू आहेत. अकोला पोलिसांना तिचा किंवा तिच्या पालकांचा जबाब नोंदविण्याबाबत सुचना देण्यात आली असल्याचे सोळंके यांनी सांगितले.दरम्यान, अकोला जिल्हा सवार्ेपचार रूग्णालयामध्ये या घटनेसंदर्भात चौकशी केली असता, अशा प्रकारचा रूग्ण आला होता; मात्र लगेच निघून गेला, अशी माहिती सुत्रांनी दिली. सवार्ेपचार रूग्णालयात रूग्णाने स्वत:चे नाव कल्पना खानंदे असल्याचे सांगितले. बारूग्ण विभागामध्ये तिने नाव नोंदणी केली; मात्र कोणतीही तपासणी न करताच निघून गेली, अशी माहिती रूग्णालय सुत्रांनी दिली. (शहर प्रतिनिधी)