शहरांच्या विकासासाठी देशाकडे सामर्थ आणि राजकीय इछाशक्तीची कमी नाही. मात्र आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, मुंबई सारख्या शहरात, तोवर प्रोजेक्ट वेगाने उतरवले जाऊ शकत नाहीत, जोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राधान्य क्रमावर विकास नसेल. जेव्हा राज्यात विकासासाठी समर्पित सरकार असते आणि जेव्हा शहरांमध्ये सुशासनासाठी समर्पित शासन असते, तेव्हाच ही कामे वेगाने जमिनीवर येऊ शकतात. यामुळेच मुंबईच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिकाही मोठी आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही -मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही, केवळ मुंबईच्या हक्काच्या पैशांचा योग्य जागी विनियोग व्हायला हवा. जर तो भ्रष्टाचारात लागेल, बँकांच्या तिजोरीत पडून राहील, विकास कामे रोखण्याची प्रवृत्ती असेल, तर मुंबईचे भविष्य उज्वल कसे होईल, असा सवालही मोदींनी यावेळी उपस्थित केला. मुंबईतील लोकांना, येथील सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागावा, हे शहर विकासाठीशी तरसावे, अशी स्थिती २१ व्या शतकातील भारतासाठी अस्वीकार्य आहे आणि शिवजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर कधीच होऊ शकत नाही, असे म्हणत मोदींनी नाव न घेता महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर (उद्धव ठाकरे गट) हल्ला चढवला.
दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार हवे -भाजपचे सरकार असो अथवा एनडीएचे सरकार असो, राजकीय स्वार्थासाठी विकासाच्या कामांना ब्रेक लावत नाहीत. आधी मुंबईत असं होताना वारंवार पाहिले आहे.पीएम स्वनिधी योजनाही याचे उदाहरण आहे. असेही मोदी यावेळी म्हणाले. भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक केले. तसेच, शिंदे-फडणवीसांची जोडी तुमचं स्वप्न पूर्ण करेल, असा विश्वासही महाराष्ट्रातील जनतेला दिला. दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार हवे आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.
फेरीवाल्यांचा धंदा झाला नाही, उसने पैसे घेतलेले होते, ते व्याज देण्यातच जात होते. घरी मुले उपाशी असायची. आता तसे होणार नाही. मिळालेल्या स्वनिधीवर व्याज द्यावे लागणार नाही. तुम्ही एक पाऊल पुढे या मी 11 पावले येण्यास तयार आहे, असेही मोदी यावेळी म्हटले. मुंबईच्या या विकासकामांसाठी मी मुंबईचे, महाराष्ट्राचे आणि मुंबई ही देशाची राजधानी असल्याने देशातील जनतेचे अभिनंदन करतो, असेही मोदींनी यावेळी म्हटले.