पत्रकारांच्या प्रश्नावर किंवा विधानसभेत बिहारचे नितीशकुमार अनेकदा भडकताना दिसले आहेत. परंतू आज त्यांचा मुड काही औरच होता. नितीश कुमार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्यांनी उत्तर न देता त्यांच्या पाठी मागे उभ्या असलेले मंत्री अशोक चौधरी यांना शोधले आणि त्यांनी मान पकडून त्यांना पत्रकारांसमोर उभे केले.
नितीश कुमारांच्या आजच्या या मुडमुळे पत्रकारही अचंबित झाले होते. मॉरिशसचे पहिले पंतप्रधान दिवंगत शिवसागर रामगुलाम यांच्या जयंतीसाठी नितीशकुमार आले होते. तेव्हा पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नानंतर हा किस्सा घडला.
पत्रकारांपैकी एका पत्रकाराच्या कपाळावर टिळा लावला होता. प्रश्न ऐकत असताना नितिशकुमारांनी अचानक मागे वळून मागे उभे असलेल्या लोकांमध्ये चौधरींना शोधू लागले. यानंतर थोडेसे पुढे जात चौधरी यांच्या मानेला पकडले आणि त्यांना मीडियासमोर आणून उभे केले.
इमारत बांधकाम मंत्री अशोक चौधरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात ते भजन-कीर्तन करताना दिसत होते. नितीश कुमार यांनाही या व्हिडिओची माहिती मिळाली, कदाचित याच कारणामुळे नितीश कुमार आज अशोक चौधरीसोबत असे वागले.
नितीशकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना इंडिया आघाडीच्या एकतेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी या प्रश्नावर लगेच तेजस्वींना पुढे केले, व आता बोल, असे सांगितले होते.