गुजरात म्हटलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. तसं पाहिलं तर महात्मा गांधींपासून ते मोदींपर्यंत अनेक दिग्गज या भूमीनं दिले आहेत. तर, महाभारतातील गोकुळ श्रीकृष्णाचीही द्वारका गुजरातमध्येच आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे, पण अहदमदाबाद हे शहर नेहमीच चर्चेत असते. साबरमती नदी आणि महात्मा गांधींचं आश्रम हेही अहमदाबादेतच आहे. त्यामुळे, विकासाच्या मुद्द्यावरुनही मोदींचे अहमदाबादकडे विशेष लक्ष आहे. अहमदाबादची एक वेगळी खासियात आहे.
अहमदाबादमधील काही घरांवर पांढऱ्या रंगाने पेंट केले जाते. आपल्या घरावरील छतांना पांढऱ्या रंगाने पेंट करण्यात आले आहे. मग, हा पांढरा रंग नेमका कशासाठी? असा प्रश्न सर्वांनाच पडेल याच शंका नाही. जयपूरमध्ये गुलाबी रंगाच्या भींती असल्याने जयपूरला पिंक सिटी म्हटले जाते, तर जोधपूरमध्ये निळ्या रंगांची घरे दिसून येतात. मात्र, अहमदाबादच्या पांढऱ्या रंगाचं कारण काहीसं वेगळंच आहे.
अहमदाबाद हे देशातील सर्वात उष्ण शहर मानले जाते. एप्रिल महिन्यातच येथील तापमान ४० डिग्री सेल्सीयस एवढे होते. त्यामुळे, उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होतात, तर आजारपणाचीही लक्षणे वाढीस लागतात. अस्थमा, ताप, वायरल इत्यादी त्रास सुरू होतो. सध्या पावसाळा संपल्याने महाराष्ट्रात थंडीचं वातावरण आहे, पण गुजरातमध्ये सद्यस्थितीत ऊनाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळेच, आत्तापासूनच अहमदाबादमध्ये काही लोकांनी घराच्या छतावर पांढऱ्या रंगाने रंगविण्यास सुरुवात केली आहे. तसेच, काही घरांत मॉड्युलर कुलींग छतही बसवण्यात येते. या छतावर नाराळाच्या झाडाची पाने, पेपर वेस्ट इत्यादी टाकले जाते. त्यामुळे, उष्णता घरातील व्यक्तींना कमी प्रमाणात जाणवते आणि घर थंड राहण्यास मदत होते. अहमदाबादमधील गरिबवस्तीत हा ट्रेंड दिसून येतो. यापूर्वी २०१६ मध्ये अशा पांढऱ्या रंगाने छत रंगवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.