शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

कोणत्याही हवामानात सैन्य चीन सीमेपर्यंत जाणार; सेला बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 5:45 AM

चीनच्या सीमेपर्यंत बारमाही रस्ता उपलब्ध करून देणाऱ्या ‘सेला बोगद्या’सह ५५,६०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व व शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.

ईटानगर : ईशान्य भारताच्या विकासाकडे काँग्रेसने नेहमीच दुर्लक्ष केले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. आपल्या सरकारने ५ वर्षांत जी विकासकामे ईशान्येत केली, त्यासाठी काँग्रेसला २० वर्षे लागली असती, असेही मोदी यांनी म्हटले.

चीनच्या सीमेपर्यंत बारमाही रस्ता उपलब्ध करून देणाऱ्या ‘सेला बोगद्या’सह ५५,६०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व व शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील हे विकास प्रकल्प आहेत. त्यानिमित्त अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथे त्यांची जाहीर सभा झाली.

असा आहे सेला बोगदा

- सेला बोगदा हा जगातील सर्वाधिक लांबीचा जुळा बोगदा आहे.- जुळ्या बाेगद्यांपैकी एक बोगदा १,००३ मीटर, तर दुसरा १,५९५ मीटर लांब आहे.- त्याला ८.६ किमी लांबीचा ॲप्रोच व लिंक रोड आहे.- संकटाच्या काळात बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र सुटका मार्ग त्यात आहे.- तो समुद्र सपाटीपासून १३ हजार फूट उंचीवर आहे.- दररोज ३ हजार कार आणि २ हजार ट्रक बोगद्यातून धावू शकतात.- बोगद्यात ताशी ८० किमी वेगाने वाहने धावू शकतील.- बोगद्याच्या बांधकामासाठी ९० लाख मनुष्य तास लागले. सरासरी ६५० कामगारांनी ५ वर्षे त्यावर काम केले.- बांधकामासाठी ७१ हजार मेट्रिक टन सिमेंट, ५ हजार मेट्रिक टन स्टील आणि ८ हजार मेट्रिक टन स्फोटके लागली.

३५ हजार घरकुलांचे वाटप

अरुणाचल प्रदेशातील ४१ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन यावेळी मोदी यांनी केले. पंतप्रधान घरकुल योजनेतील ३५ हजार घरांचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी