एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमधील नितीश सरकारने सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. राजदच्या तीन आमदारांनी पाठिंबा दिल्याने ठरावाच्या बाजूने १२९, तर विरोधात शून्य मते पडली. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना हटविण्याच्या वेळी सरकारच्या बाजूने १२५ मतेच पडली होती.
२००५ पासून आम्हाला संधी मिळाली. तेव्हापासून बिहारमध्ये किती विकास झाला हे पहा. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी आम्ही काम केले. राज्यात आज शांतता आहे. - नितीश कुमार, मुख्यमंत्री
तावडेंनी हलविली सूत्रे विश्वासदर्शक ठरावापूर्वी राजदने जदयूचे ५ व भाजपचे ३ आमदार गळाला लावले. १२२ मतांचा आकडा गाठणे भाजप-जदयूसाठी कठीण होते. प्रभारी विनोद तावडे यांनी सूत्रे हाती घेतली. जयदूचे ३ आमदार परत आणले व राजदच्या ३ आमदारांनाही गोटात आणले.
एकाच कार्यकाळात तीनवेळा मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री सांगतात की ते आमच्यावर खूश नाहीत. आम्ही खूश करण्यासाठी नव्हे, तर कामासाठी एकत्र आलो होतो. - तेजस्वी यादव, राजद नेते.