शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

आरारा खतरनाक! आता कुत्र्यांसाठीही बनवलं जातंय जात प्रमाणपत्र; अर्ज पाहून अधिकारी अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 6:54 PM

बिहारच्या गयामध्ये एका व्यक्तीने कुत्र्याच्या जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे.

गया : बिहारच्या गयामध्ये एका व्यक्तीने कुत्र्याच्या जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. हे पाहून स्थानिक अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. खरं तर ही घटना गया जिल्ह्यातील गुरुरु झोनल कार्यालयातील आहे. इथे कुत्र्याच्या नावाने जातीचा दाखला मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात आला आहे. या अर्जात अर्जदाराचे नाव- टॉमी, वडिलांचे नाव- शेरू, आईचे नाव- गिनी, गाव- पांडेपोखर, ग्रामपंचायत- रौना, प्रभाग क्रमांक-13 असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर कुत्र्याचा आधार कार्ड क्रमांक 993460458271 टाकण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे आधार कार्ड देखील अपलोड केले आहे. दरम्यान, अर्जात 993460****  असा मोबाईल क्रमांकही नमूद आहे. व्यवसाय- विद्यार्थी, जन्मतारीख- 14/4/2022 अशी लिहिली आहे. अर्ज क्रमांक आहे, BCCCO/2023/314491. या अर्जात स्वत:चे प्रतिज्ञापत्रही देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे हा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. आधार कार्डवर कुत्र्याचा फोटोही चिकटवला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर कार्यालयात खळबळ उडाली असून अर्जदाराचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

खोडसाळपणा केला असल्याची अधिकाऱ्यांना शंकाया संदर्भात गुरुरु ब्लॉकचे ऑफिसर संजीव कुमार त्रिवेदी यांनी सांगितले की, दिलेल्या मोबाईल नंबरवर डायल केल्यास ट्रूकॉलरवर राजा बाबू गुरुरू यांचे नाव येत आहे. विभाग याला कोणाचा तरी खोडसाळपणा मानत आहे. ते म्हणाले की, एकीकडे सरकार ऑनलाइन सुविधा देत आहे. तर दुसरीकडे उपद्रवी घटक याच्याशी गैरप्रकार करत आहेत. गैरप्रकार करणाऱ्यांची लवकरच ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिक म्हटले. बिहारमध्ये सध्या जातीय जनगणना सुरू आहे. यादरम्यान गया येथील कुत्रेही आपली जात प्रमाणपत्र काढण्यासाठी सरकारी कार्यालयात अर्ज करत आहेत. मात्र, हा काही लोकांचा खोडसाळपणा असून त्यांनी टॉमीच्या नावाने मंडळ कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :BiharबिहारCaste certificateजात प्रमाणपत्रdogकुत्राAdhar Cardआधार कार्डViral Photosव्हायरल फोटोज्