धक्कादायक! 16 व्या वर्षी प्रेमात अन् 26 व्या वर्षी गरोदर; 'गर्भपात' करून प्रियकर झाला फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:02 AM2023-01-18T11:02:30+5:302023-01-18T11:03:02+5:30
Love and Betrayal: मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातीलग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने गेस्ट हाऊसमध्ये बोलावून बलात्कार केला असल्याचा आरोप येथील पीडित महिलेने केला आहे. त्यानंतर मागील 10 वर्षे तो लग्नाच्या बहाण्याने तिचे शोषण करत होता. पीडितेने आपण गर्भवती असल्याचे तिच्या प्रियकराला सांगितल्यावर तरुणाला धक्का बसला. महिलेचा आरोप आहे की, जेव्हा तिने प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा त्याने धक्कादायक कृत्य करत तिचा गर्भपात केला. या प्रकरणी पीडित तरुणीने इंदरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकरावर बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
माहितीनुसार, ग्वालियर येथील छप्पर वाला पुल परिसरात राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने इंदरगंज पोलीस ठाण्यात FIR दाखल केला आहे. पीडितेची 10 वर्षांपूर्वी डीडी नगर भागात राहणाऱ्या रोहित जदौन नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एक दिवस रोहितने मुलीला गेस्ट हाऊसमध्ये बोलावून तिथे तिच्यावर बलात्कार केला असा आरोप तिने केला. मुलीने विरोध केल्यावर रोहितने तिला लग्नाचे आमिष दाखवले असेही पीडितीने सांगितले. यादरम्यान रोहितने लग्नाच्या नावाखाली 10 वर्षे तिचे शोषण सुरूच ठेवले, मात्र लग्न केले नाही. काही दिवसांपूर्वी मुलगी गरोदर राहिली. तिने रोहितला हा प्रकार सांगितला आणि लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा रोहितने त्याच्या अन्य मैत्रिणीसोबत तिला गोळी खाऊ घातली, त्यामुळे तिचा गर्भपात झाला.
प्रियकराविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, रोहितने तिचा गर्भपात केला असल्याचे पीडित महिलेने सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे यानंतर देखील ती आरोपीसोबत राहण्यास तयार होती. मात्र, तिने लग्नासाठी दबाव टाकला असता रोहितनेही लग्नास नकार दिला. अखेर नाराज होऊन तरुणीने इंदरगंज पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीसोबतचे फोटो, चॅट आणि इतर पुराव्याच्या आधारे आरोपी रोहितविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. इंदरगंज सर्कलचे सीएसपी विजय सिंह भदौरिया यांनी सांगितले की, मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"