नवी दिल्ली : हरयाणातील रायगड जिल्ह्यात 2 वर्षांपूर्वी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी'च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक उघडकीस आली होती, त्यात सुमारे 17 हजार अपात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून जवळपास 25 कोटींची फसवणूक केली होती. या फसवणुकीतील शेतकऱ्यांची संख्या आता 53 हजार झाली असून, त्यांच्याकडून सुमारे 43 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. अशा स्थितीत कृषी विभाग आता बनावट शेतकऱ्यांची यादी तयार करून महसूल विभागाकडून जमा करण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, PM किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ मिळावा हा या योजनेचा उद्देश होता. योजनेच्या सुरुवातीला अपात्र शेतकऱ्यांना पात्र ठरविताना त्यांची ऑनलाइन माध्यमातून नोंदणी करण्यात आली. अशा प्रकारे अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा करण्यात आली. ही बाब जिल्हा प्रशासनाला कळेपर्यंत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि चुकीच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून किसान सन्मान निधीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले होते. त्यानंतर कृषी विभाग त्या क्षेत्राची पडताळणी करून आधार लिंकच्या माध्यमातून अधिक माहिती घेत आहे.
बनावट शेतकऱ्यांनी उचलला फायदा यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि आता सुमारे 43 कोटींची रक्कम 53 हजार अपात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. सर्वाधिक शेतकरी (23 हजार 379) पुसौर ब्लॉकमधील असल्याचे समोर आले आहे. मात्र, मागील दोन वर्षांत विभागाला शेतकऱ्यांकडून केवळ 12 लाख रुपयेच वसूल करता आले आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, यापूर्वी ऑनलाइन नोंदणीमुळे अपात्र शेतकरी देखील योजनेंतर्गत पात्र ठरले आणि त्याचा लाभ घेतला, ज्यांची वसुली शासनाकडून केली जात आहे. यासाठी पटवारी व महसूल विभागाकडून घरोघरी जाऊन लोकांकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बनावट शेतकऱ्यांची आकडेवारी
- रायगड ब्लॉकमध्ये 836 शेतकरी, ज्यांच्याकडे 1 कोटी 16 लाख 6 हजार एवढी रक्कम.
- खरसिया ब्लॉकमध्ये 3507 शेतकरी असून त्यांच्याकडे 4 कोटी 32 लाख 64 हजार रूपये आहेत.
- तमनार ब्लॉकमध्ये 995 शेतकरी, ज्यांच्याकडे 1 कोटी 41 लाख 50 हजार एवढी रक्कम आहे.
- पुसौरमध्ये सर्वाधिक 23379 शेतकरी असून 12 कोटी 38 लाख 38 हजार एवढी रक्कम आहे.
- घरघोडा ब्लॉकमधील 93 शेतकरी, ज्यांच्याकडे 12 लाख 26 हजार रक्कम आहे.
- लैलुंगा ब्लॉकमधील 786 शेतकरी, ज्यांच्याकडे 13 कोटी 40 लाख 2 हजार एवढी रक्कम आहे.
- धरमजाईगड ब्लॉकमधील 9890 शेतकरी आहेत, ज्यांच्याकडून 58 लाख 38 हजार एवढी रक्कम वसूल करायची आहे.
- बर्माकेला ब्लॉकमधील 3999 शेतकरी, ज्यांच्याकडे 2 कोटी 6 लाख 8 हजार एवढी रक्कम आहे.
- सारंगढ ब्लॉकमधील 9752 शेतकरी, ज्यांच्याकडून 7 कोटी 86 लाख 48 हजार वसूल करायचे आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"