पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच PFI आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक संघटनांवर केंद्र सरकारने बुधवारी (28 सप्टेंबर) बंदी घातली. या मुद्द्यावर अनेक ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. यातील एका वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रादरम्यान, सुप्रीम कोर्टाचे वकील अश्विनी उपाध्याय यांनी पीएफआयवर जोरदार निशाणा साधला. तसेच काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवत, भारत देशात शांतता संविधानामुळे नाही तर हिंदूंमुळे आहे, असेही विधान केले.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील अश्विनी उपाध्याय म्हणाले, "आजच पीएफआयवर बंदी घालण्यात आली आणि आज काँग्रेसने दिग्विजय सिंह यांचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी पुढे केले यामागे काय कारण असू शकते? कदाचित उद्या ते काँग्रेसचे अध्यक्षही होतील. हे तेच दिग्विजय सिंह आहेत, जे पीएफआयसोबत स्टेजवर कार्यक्रमांना उपस्थित राहतात. ते या संघटनेचे सर्वात मोठे समर्थक आहेत. तेच दिग्विजय सिंह बाटला हाऊसला देखील थ्रो-इन एन्काउंटर असल्याचे सांगतात. ते ते ओसामा आणि दाऊद सारख्या अतिरेक्यांनाही जी असं संबोधित करतात. या साऱ्याचे काय कारण असेल याचा विचार करा."
"मला आता तरी असे दिसत आहेकी पीएफआय संपला आहे, परंतु त्याचा सर्वात मोठा समर्थक काँग्रेस पश्राचा अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे यात नक्की काय संबंध ते तुम्ही ओळखू शकता? लोक अनेक गोष्टींच्या गप्पा मारतात पण मी म्हणतो की या देशात सुख-शांती, धर्मनिरपेक्षता ही केवळ संविधानामुळे नाही, भारतातील धर्मनिरपेक्षता आणि शांतता ही हिंदूंमुळेच प्रस्थापित झाली आहे. आधी हे हिंदू ९० टक्के होते, पण ते ७८ टक्क्यांवर आले आहेत", असे सूचक विधान त्यांनी केले.
"जिथे हिंदूंचा नाश झाला तिथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. काश्मीर, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये धर्मनिरपेक्षता चालत नाही. ज्या नऊ राज्यांत हिंदूंवर अन्याय झाला आहे तेथे धर्मनिरपेक्षता चालत नाही. या देशात जो बंधुभाव टिकून आहे तो हिंदूंमुळेच", असे त्यांनी ठणकावले. "पीएफआय दहशत पसरवते, लव्ह जिहादला समर्थन देते, धर्मांतर घडवून आणते. परदेशी निधी घेते. मदरसा चालवते, विविध पुस्तकांना समर्थन देते. त्यात इस्लामला न मानणारे काफिर असल्याचे सांगितले जात आहे", असे आरोपही त्यांनी केले.