नवी दिल्ली - गेल्या ५ दशकात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली आहे. यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमनेसामने आले. एनडीएकडून ओम बिर्ला यांचा विजय निश्चित मानला जात होता परंतु विरोधी पक्षानेही के. सुरेश यांना निवडणुकीत उतरवून मागील १० वर्षात ज्याप्रकारे सरकारचा मार्ग सुलभ होता तसा आता नाही हे स्पष्ट संकेत दिले. या निवडणुकीत जय पराजय महत्त्वाचं नाही तर आयरिश स्विच गेमसारखं आपले सर्व पत्ते वापरले गेले पाहिजेत.
भारताच्या सध्याच्या पिढीने निवडणूक पाहिली असेल परंतु लोकशाहीचं केंद्र असलेल्या संसदेत लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होताना याआधी केवळ दोनदा पाहिलं असेल. १९५२ आणि १९७६ साली लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळावं ही काँग्रेसची अट आणि भाजपाचं संख्याबळ यावर सहमती न बनल्याने निवडणुकीची वेळ आली आहे. आता एनडीएने ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीने के सुरेश यांना मैदानात उतरवलं आहे.
राजकारणात नेहमी तुमचा सिक्का चालला नाही पाहिजे तर सतत चमकता ठेवणं गरजेचे असते. तुम्हाला ना केवळ तुमच्या मित्रांवर तर विरोधकांवरही करडी नजर ठेवावी लागते. लोकसभेत नंबरगेम पाहिला तर यंदा २०१४ आणि २०१९ पेक्षा वेगळी स्थिती आहे. एनडीएच्या नेतृत्वात भाजपा २४० जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला आहे. परंतु गेल्या २ निवडणुकीप्रमाणे पक्षाला बहुमताच्या २७२ जागांपासून वंचित राहावे लागले आहे. निवडणुकीपूर्वी केलेली आघाडीमुळे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले. लोकसभेत एनडीएचं संख्याबळ २९३ जागांचे आहे. बहुमत आणि लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी २७२ जागा असाव्या लागतात. त्यापेक्षा २१ जागा सत्ताधाऱ्यांकडे अधिक आहेत.
दुसरीकडे विरोधी पक्षांकडे पाहिले तर काँग्रेस ९९ जागांवर विजयी झाली आहे. परंतु राहुल गांधी २ जागांवर जिंकले आहेत. त्यांनी वायनाड जागेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे संसदेत काँग्रेसकडे ९८ जागा आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीकडे २३३ खासदार आहेत. त्याशिवाय ७ सदस्यांसोबत अन्य १६ खासदारही आहेत. मात्र त्यांचा फारसा काही फरक नंबर गेमवर पडणार नाही.
आयरिश स्विच गेमचा उल्लेख का?
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या भारत देशात संसदेत नंबरगेम हा जय पराजयासाठी दोन्ही पक्षांना महत्त्वाचा आहे. हा नंबरगेम खास आहे कारण त्याचा निकालही सर्वांना माहिती आहे. यूरोपीय देश आयरलँडमध्ये कार्ड गेमसाठी एक शातिर खेळीचा उल्लेख होतो. आयरिश स्विच, राजकारणात हे गरजेचे मानले जाते. या शब्दाचा वापर अशा परिस्थितीत केला जातो जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलत राहाल, दुसऱ्या कुणाचा हात आपल्या हाती घ्याल आणि कुणी तिसऱ्यावरच तुमची नजर राहील.
राजकारणातील पॉवर बॅलेन्सचा नियम आयरिश स्विच गेममध्ये दिसून येतो. हा एक कार्ड गेम आहे. त्यात खेळाडूंना सुरुवातीला समसमान कार्डवाटप केले जाते. प्रत्येक व्यक्तीला ७ कार्ड, या सर्व कार्डमध्ये समान मूल्य असते, परंतु काही कार्डला पॉवर अथवा ट्रीक कार्ड म्हणून ओळखले जाते. कारण त्यांच्या खेळीने गेमवर थेट परिणाम होतो. भारत असो वा अमेरिका, प्रत्येक ठिकाणी राजकारणात पॉवर कार्ड सर्वात महत्त्वाचे असते.