शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप पुन्हा मेहबुबांच्या PDP सोबत निवडणूक मैदानात उतरणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 11:18 AM

Jammu Kashmir Election : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहेत. तारखांची घोषणाही करण्यात आली आहे. यातच, भाजप आणि पीडीपी युतीसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहेत. तारखांची घोषणाही करण्यात आली आहे. यातच, भाजप आणि पीडीपी युतीसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारले असता, ना आम्ही असे काही बोललेलो आहोत, ना ते बोलले आहेत, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

कलम 370 कधीही बहाल केलं जाणार नाही -कलम 370 संदर्भात बोलताना अमित शाह म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये संविधानाचे कलम 370 कधीही बहाल केले जाणार नाही. तर, नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि पीडीपीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या जाहीरनाम्यात, ही वादग्रस्त तरतूद पुन्हा आणण्यासाठी काम करू, असे आश्वासन दिले आहे.

आता जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 ला कसलेही स्थान नाही -यासंदर्भात शाह यांना विचारले असता ते म्हणाले, आता जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 ला कसलेही स्थान नाही आणि कधी असेल. ते कधीही बहाल केले जाणार नाही. कलम 370 नरेंद्र मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी रद्द केले होते आणि जम्मू-काश्मीरचे लडाख आणि जम्मू असे दोन केंद्र शासित प्रदेश करण्यात आले होते.

पीडीपीचा जाहीरनामा -तत्पूर्वी पीडीपीने आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन दिले आहे की, आपण जम्मू-काश्मीरला "मूळ स्थिती" बहाल करण्याचा प्रयत्न करू. याच बरोबर भारत आणि पाकिस्तानदरम्यान विश्वास निर्माण करण्यासंदर्भातील उपाययोजना (CBMs) आणि प्रादेशिक सहकार्याचे समर्थन करू. पीडीपी कलम 370 आणि 35A अवैध आणि असंवैधानिकपणे रद्द केल्याचा विरोध करते आणि जम्मू-काश्मीरला त्याची मूळ स्थितीत बहाल करण्यासाठी वचनबद्ध आहे. जेणेकरून, येथील नागरिकांचा आवाज ऐकला जाईल आणि त्यांच्या अधिकारांचे सुरक्षण होईल. 

पीडीपीच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की 2019 मध्ये कलम 370 आणि 35A च्या "असंवैधानिक आणि बेकायदेशीर रद्द" केल्याने काश्मीर प्रश्न आणखी गुंतागुंतीचा झाला आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत मतदान -जम्मू-काश्मीरच्या 90 सदस्यीय विधानसभेसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर, अशा तीन टप्प्यांत मतनाद होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला निकाल लागेल. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाPDPपीडीपी