शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

प्रियकरानं शारीरिक संबंध ठेवले अन् लग्नास नकार; प्रेयसीचं तरूणाच्या घरासमोरच धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 7:41 PM

प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. असाच एक अजब प्रकार झारखंडमधून समोर आला आहे. कारण प्रियकराने नकार देताच प्रेयसीने त्याच्या घरासमोर धरणे आंदोलन केले. या प्रेमवेड्या प्रेयसीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दुखावलेली तरुणी गेल्या ४८ तासांपासून प्रियकराच्या घरासमोर धरणे आंदोलन करत आहे. कडाक्याच्या थंडीत उघड्यावर बसलेल्या संबंधित तरूणीने सांगितले की, जोपर्यंत तिचा प्रियकर तिच्याशी लग्न करण्यास होकार देत नाही तोपर्यंत ती येथून हलणार नाही. मुलाच्या कुटुंबीयांनी दरवाजा बंद केला आहे. कुटुंबातील एकही सदस्य बाहेर पडत नसल्याचे ती सांगते. 

बिहारमधील धनबाद जिल्ह्यातील रामकुंडा आमतांड या गावातील ही घटना आहे. ही तरुणी गिरिडीह जिल्ह्यातील रहिवासी आहे. रामकुंडा आमतांड येथे राहणारा रोहित कुमार याच्यासोबत तिचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते, असे तिचे म्हणणे आहे. या काळात दोघेही अनेकदा भेटले आणि फोन कॉल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहिले.  

प्रेयसीचं धरणे आंदोलन दरम्यान, या तरुणाने तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र आता तो तिच्याशी लग्न करण्यास नकार देत आहे. त्याने बोलणेही बंद केले. आंदोलनाला बसलेली मुलगी लोकांना तिचे रोहितसोबतचे चॅटिंग, व्हिडीओ आणि फोटो दाखवत आहे. आरोपी तरुण फरार झाला असून त्याचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नसल्याचे कळते. मुलीचे आधीच लग्न झाले असल्याचा दावा रोहितच्या घरच्यांनी केला.

विशेष बाब म्हणजे तरुणीने सांगितले की, यापूर्वी ज्या तरुणाशी तिचे लग्न झाले होते, त्याला तिची संमती नव्हती. दोघेही खूप वर्षांपूर्वी वेगळे झाले. मुलीचे असेही म्हणणे आहे की, तिने तिच्या भूतकाळातील सर्व काही रोहितला सांगितले होते आणि त्यानंतर त्यांच्यात नवीन नातं निर्माण झालं. पण ऐनवेळी रोहितने लग्नाला नकार दिला. 

तरूणीने दिलेल्या माहितीनुसार, तिने नोव्हेंबर महिन्यात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांचे लग्न लावून देण्याचे सांगितले होते, मात्र रोहितच्या घरच्यांनी नकार दिला. सोमवारी दुपारपर्यंत मुलीचे आंदोलन सुरूच होते. तिला काही झाले तर त्याला रोहित आणि त्याचे कुटुंब जबाबदार असेल असे तिने सांगितले. 

टॅग्स :JharkhandझारखंडLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टSocial Viralसोशल व्हायरलmarriageलग्न