नवी दिल्ली : झारखंडमधील धनबाद येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे लग्नाला नकार दिल्याने संतापलेल्या प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन केले. 96 तासांहून अधिक काळ लोटला असून या कडाक्याच्या थंडीत प्रेयसी आंदोलन करत आहे. प्रेयसी आपल्या घरासमोर आंदोलनाला बसल्यानंतर प्रियकर फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजूबाजूचे लोक संबंधित तरूणीला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मुलगी लग्न केल्यावरच आंदोलन सोडणार असल्याचे म्हणत आहे.
दरम्यान, प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने आंदोलनाचे हत्यार उचलले. प्रेयसी प्रियकराच्या घरासमोर अनिश्चित काळासाठी आंदोलनाला बसली असून प्रियकराशी लग्न करण्याची तिची मागणी आहे. मुलीसोबत तिची वृद्ध आजी आणि वडीलही आपल्या मुलीच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत.
कडाक्याच्या थंडीत आंदोलन सुरू धनबाद जिल्ह्यातील राजगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या उत्तम महतो या प्रियकराच्या घरासमोर धरजोरी येथील एक तरुणी रात्रंदिवस आंदोलन करत आहे. रात्रीच्या थंडीमुळे लोकांना घराबाहेर पडावेसे वाटत नाही. मात्र, प्रेयसीने कडाक्याच्या थंडीत देखील आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे.
प्रेयसी आंदोलनावर ठाम स्थानिक लोकांनी याप्रकरणी तरूणीची समजूत काढली मात्र, ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. आंदोलक प्रेयसीच्या म्हणण्यानुसार, एसएसएलएनटी कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. मागील 4 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते आणि याची माहिती दोन्ही कुटुंबातील लोकांना देखील होती. खरं तर प्रियकराने लग्नाला आधी होकार दिला होता पण नंतर तो पलटला. जोपर्यंत प्रियकर लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे प्रेयसीने म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"