नवी दिल्ली : बिहारमधील खगरिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे चक्क नसबंदी केल्यानंतर भूल देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना भूल न दिल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. पीडित पी कुमारी यांनी आरोप केला आहे की, ऑपरेशन दरम्यान नाही तर नंतर भूल देण्यात आली. यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. ही बाब उघडकीस आल्यानंतर सिव्हिल सर्जन डॉ. ए. यांनी चौकशी करून आरोपींवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
डॉक्टरांनी दिले कारवाईचे आश्वासन ही धक्कादायक घटना खगरिया जिल्ह्यातील अलौली प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबिरात घडली. डॉक्टरांनीमहिलांना भूल न देता त्यांची नसबंदी केली. यादरम्यान महिला वेदनेने आक्रोश करत होत्या, मात्र त्यांचे कोणीही ऐकले नाही. खरं तर तेथे डॉक्टरही उपस्थित नव्हते, केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रिया केल्याचा आरोप काही महिलांनी केला आहे.
पीडित महिलांनी केले गंभीर आरोप त्रास होऊ लागल्यानंतर पीडित महिलांनी एकच गोंधळ घातला. भूल देण्याचे इंजेक्शन न देता त्यांच्यावर जबरदस्तीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. ऑपरेशन दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याचे हात, पाय पकडून तोंड बंद ठेवले आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.
लक्षणीय बाब म्हणजे एका खासगी संस्थेने आरोग्य विभागाच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केले होते. मात्र बिहारच्या आरोग्य सेवेचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. एका महिलेच्या नसबंदी ऑपरेशनसाठी सरकार या एनजीओला २,१७० रुपये देते. नसबंदीची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने पुरेशी वैद्यकीय व्यवस्था आणि खबरदारी न घेता अशा पद्धतीने ऑपरेशन केले जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"