देव तारी त्याला कोण मारी! बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीला बाहेर काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 08:04 PM2023-07-18T20:04:10+5:302023-07-18T20:04:23+5:30

MP Borewell Incident : 'देव तारी त्याला कोण मारी' याचाच प्रत्यय मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात आला आहे.

 in Madhya Pradesh A two-and-a-half-year-old girl fell into a borewell in Kajari Barkheda village of Vidisha  | देव तारी त्याला कोण मारी! बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीला बाहेर काढण्यात यश

देव तारी त्याला कोण मारी! बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीला बाहेर काढण्यात यश

googlenewsNext

Vidisha Child In Borewell : 'देव तारी त्याला कोण मारी' याचाच प्रत्यय मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात आला आहे. इथे अडीच वर्षीय चिमुकली बोअरवेलमध्ये पडली होती पण सुदैवाने तिला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मध्य प्रदेशातील विदिशा येथील कजरी बारखेडा गावात ही घटना घडली असल्याचे कळते.
 
प्रशासकीय अधिकारी हर्षल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर तिच्या प्रकृतीबद्दल अधिक कळू शकेल. संबंधित मुलगी १३ फूट खोलीच्या बोअरवेलमध्ये पडली होती. बचाव पथकामुळे तिला बाहेर काढण्यात यश आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बोअरवेलमध्ये मुलगी पडल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासन आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी हजर दाखल झाली. अथक प्रयत्नांनंतर चिमुकलीला बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, मुलगी ज्या बोअरवेलमध्ये पडली होती, ती घराच्या आतच असून बोअरवेल सुमारे १३ फूट खोल आहे. चिमुकली पडल्याचे कळताच तिच्या आईने टाहो फोडला. पण बचाव पथकाच्या मेहनतीमुळे तिला बाहेर काढण्यात यश आले असून रूग्णालयात नेण्यात आले आहे.
 

Web Title:  in Madhya Pradesh A two-and-a-half-year-old girl fell into a borewell in Kajari Barkheda village of Vidisha 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.