"ऐकलं नाहीस तर श्रद्धासारखे तुकडे करीन", पत्नीचा कॉन्स्टेबलवर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:03 PM2023-01-18T12:03:09+5:302023-01-18T12:04:04+5:30

Shivpuri constable Rape Case: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे पत्नीने कॉन्स्टेबल पतीवर गंभीर आरोप केले आहेत. 

In Madhya Pradesh's Shivpuri, a wife has accused her of having an unnatural relationship with a constable husband  | "ऐकलं नाहीस तर श्रद्धासारखे तुकडे करीन", पत्नीचा कॉन्स्टेबलवर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप

"ऐकलं नाहीस तर श्रद्धासारखे तुकडे करीन", पत्नीचा कॉन्स्टेबलवर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली : आयटीबीपीच्या एका जवानाने आपल्या पत्नीचे दिल्लीतील श्रद्धाप्रमाणे तुकडे करण्याची धमकी दिली, त्यानंतर पत्नीने जिल्हा दंडाधिकार्‍यांसमोर आपली व्यथा मांडली. ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील आहे, जिथे एका तरुणीने तिच्या पतीवर बलात्कार आणि अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. लग्नाच्या बहाण्याने तरुणाने तिच्याशी संबंध प्रस्थापित केल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. त्यानंतर पोलिसांच्या भीतीने त्याने लग्न केले आणि नंतर तिला सोडून दिले. यावर विरोध केल्यावर त्याने श्रद्धासारखे 35 तुकडे करण्याची धमकी दिली असे पत्नीने आरोपात म्हटले. 

सोशल मीडियावरून झाली होती मैत्री
ITBP जवान पतीने पीडितेला धमकी दिल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार केली. तरुणीने सांगितले की, तिची आणि संबंधित जवानाची सोशल मीडियावर मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर जवानाने प्रशिक्षणानंतर लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे पीडित महिला त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास तयार झाली.

गरोदर राहताच केले गर्भपात 
पीडितेने सांगितले की, ती गरोदर राहिल्यानंतर पतीने तिचा गर्भपात केला. लग्नासाठी दबाव टाकल्यावर जवानाच्या नातेवाईकांनी 20 लाख रुपयांची मागणी केली होती. याशिवाय तिचे वडील लग्नाबाबत बोलण्यासाठी तरुणाच्या घरी गेले असता तेथून त्यांना हाकलून दिले आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पीडित महिलेने सांगितले.

जवानाच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप 
संबंधित पीडित महिलेने जवान पतीच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. तरुणीचे म्हणणे आहे की, कॉन्स्टेबल रमेशच्या मेहुण्यानेही दिल्लीच्या श्रद्धाप्रमाणे तिचे तुकडे करण्याची धमकी दिली होती, याशिवाय कॉन्स्टेबलच्या काकांनीही जीवे मारण्याची धमकी दिली होती. तक्रारीनंतर शिवपुरीचे जिल्हाधिकारी अक्षय कुमार यांनी आयटीबीपीमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलशी फोनवर चर्चा केली. यावेळी पीडितेच्या पतीने ती माझी पत्नी असल्याचे सांगितले. माझे तिच्याशी लग्न देखील झाले आहे मात्र तिची कोणीतरी दिशाभूल केली असल्याचे कॉन्स्टेबलने सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: In Madhya Pradesh's Shivpuri, a wife has accused her of having an unnatural relationship with a constable husband 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.