VIDEO: एका प्रियकरासाठी शाळेतील 2 मुली एकमेकांशी भिडल्या; जखमी विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 06:42 PM2023-03-19T18:42:10+5:302023-03-19T18:42:58+5:30

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचा व्हिडीओ समोर आला आहे.

In Madhya Pradesh's Singrauli district, a fight broke out between girls in a government school over a boyfriend, the video went viral  | VIDEO: एका प्रियकरासाठी शाळेतील 2 मुली एकमेकांशी भिडल्या; जखमी विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल

VIDEO: एका प्रियकरासाठी शाळेतील 2 मुली एकमेकांशी भिडल्या; जखमी विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल

googlenewsNext

सिंगरौली : मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही मुलींमध्ये तुंबळ हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. खरं तर प्रियकरावरून या मुलींमध्ये हाणामारी झाली असल्याचे सांगितले जात आहे. मुलींनी शाळेच्या आवारातच गोंधळ घातल्याने एकच खळबळ माजली. इथे प्रेमवेड्या मुलींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि सर्वांसमोर धिंगाणा घातला. लाथा बुक्क्यांनी तसेच केस ओढून या मुली एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

दरम्यान, शनिवारी जिल्ह्यातील नवानगर या शासकीय शाळेतील आठवी व नववीच्या विद्यार्थिंनी एकमेकांशी भिडल्या. बाचाबाचीतून सुरू झालेला वाद अखेर हाणामारीपर्यंत पोहचला. या भांडणात एका विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकरण इथेच थांबले नाही आणि रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीला पुन्हा मारहाण करण्याच्या उद्देशाने मुलींनी मुलांसह रुग्णालय गाठले, मात्र तिथल्या लोकांनी त्यांना समज देऊन प्रकरण शांत केले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
दोन विद्यार्थिनींमधील भांडणाचे मुख्य कारण एक मुलगा म्हणजेच मुलींचा प्रियकर असल्याचे सांगितले जात आहे. एका विद्यार्थिनीने आरोप केला होता की, दुसरी विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासोबत बोलायची, ही बाब पहिल्या विद्यार्थिनीला समजल्यानंतर दोघींमध्ये मोठे भांडण झाले. या संपूर्ण प्रकरणाबाबत शाळेचे मुख्याध्यापक ओपी शर्मा यांनी सांगितले की, ही माहिती विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून मिळाली आहे, अशा परिस्थितीत दोन्ही विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना शाळेत बोलावून या प्रकरणाची माहिती दिली जाईल.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: In Madhya Pradesh's Singrauli district, a fight broke out between girls in a government school over a boyfriend, the video went viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.