जयपूर - राजस्थानमध्ये काेणाची सत्ता येणार, याचे एक्झिट पाेलमधून अंदाज वर्तविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात ते किती खरे ठरतात, हे मतमाेजणीच्या दिवशी ३ डिसेंबरला कळेल. मात्र, राज्यात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता विविध एक्झिट पाेलच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेसाठी मुख्य लढत सत्ताधारी काॅंग्रेस आणि भाजप या दाेन पक्षांमध्येच हाेती. राज्यात विविध प्रदेशांत काेणाला किती जागा मिळू शकतात, याचाही अंदाज व्यक्त केला आहे. त्याबाबत जाणून घेऊया.
या ठिकाणचे निकाल ठरणार निर्णायक- मेवाड, मारवाड, हाडाैती या भागात भाजपला जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. - १२० जागा या प्रदेशात आहेत. - ७० ते ७५ जागा भाजपला यापैकी मिळू शकतात.- काॅंग्रेसच्या मतांमध्येही या प्रदेशात घट झाल्याचे म्हटले आहे. - शेखावती आणि ढुंढाड प्रदेशात काॅंग्रेसला जास्त जागा मिळू शकतात.