राजस्थानात काँग्रेसमध्ये तूर्तास नेतृत्व बदल नाही, केल्यास नुकसान होऊ शकते
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 05:17 AM2023-03-19T05:17:40+5:302023-03-19T05:18:45+5:30
काँग्रेस श्रेष्ठींच्या या निर्णयामुळे युवा नेते सचिन पायलट व त्यांच्या समर्थकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
- आदेश रावल
नवी दिल्ली : राजस्थानमधील नेतृत्व बदलाबाबत काँग्रेसमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना हटवून सचिन पायलट यांच्याकडे सूत्रे दिल्यास पक्षाला काहीही फायदा होणार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वाटते. काँग्रेस श्रेष्ठींच्या या निर्णयामुळे युवा नेते सचिन पायलट व त्यांच्या समर्थकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
नेतृत्व बदल केल्यास नुकसान होऊ शकते, अशी माहिती पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्षांबरोबरच अनेक नेत्यांनी दिली. बदल केल्यास पंजाबसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असेही अनेक नेत्यांनी सांगितले आहे. तथापि, अशोक गेहलोत यांनी अर्थसंकल्प मांडण्याची परवानगी द्यावी, असे काँग्रेस श्रेष्ठींना म्हटले होते.