बिकानेर : राजस्थानच्या बिकानेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे सरकारमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या 5 महिन्यांच्या मुलीला कालव्यात फेकून दिले. कायमस्वरूपी नोकरी मिळण्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कंत्राटी कामगाराने आपल्या मुलीला इंदिरा गांधी कालव्यात फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात पत्नीनेही पतीला साथ दिली असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दोघांनाही केलं अटक ही घटना बिकानेर जिल्ह्यातील छतरगढ पोलीस स्टेशन परिसरातील आहे. रविवारी सायंकाळी आरोपी जोडप्याने चिमुकलीला कालव्यात फेकले होते. स्थानिक एसपी योगेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपी जोडप्याला अटक करण्यात आली आहे. करारावर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी या व्यक्तीने पत्नीसोबत हे पाऊल उचलले होते.
नोकरीच्या लालसेपोटी केलं धक्कादायक कृत्यपोलिसांनी सांगितले की, 36 वर्षीय झवरलाल मेघवाल हा सध्या कंत्राटी कर्मचारी असून त्याला कायमस्वरूपी सेवा मिळण्याची आशा होती. या जोडप्याला आधीच दोन मुले होती. राज्य सरकारच्या दोन अपत्य धोरणामुळे तिसर्या मुलाच्या जन्मानंतर त्या व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची भीती होती. यामुळे त्याने पत्नीसह हे पाऊल उचलून आपल्या बाळाला कालव्यात फेकून दिले.
बिकानेरचे पोलीस अधीक्षक योगेश यादव यांनी सांगितले की, सोमवारी या दाम्पत्याला त्यांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. झवरलाल मेघवाल आणि त्यांची पत्नी गीता देवी यांच्याविरुद्ध छतरगड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 120बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"