शहडोल : मध्य प्रदेशातील शहडोल येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे प्रेयसीला कंटाळून प्रियकराने आपल्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठले आहे. सर मला माझ्या प्रेयसीपासून वाचवा, अशी विनंती त्याने पोलिसांकडे केली आहे. तसेच ती मला कुणाशीही लग्न करू देत नाही आणि माझ्याशी लग्न देखील करत नाही. माझ्या घरच्यांनी मोठ्या कष्टाने माझे लग्न ठरवले होते, जे प्रेयसीने मोडले असल्याचे या तरूणाने म्हटले आहे.
दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण शहडोल जिल्ह्यातील बेओहारी पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. येथील 22 वर्षीय तरूणाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे. त्याने आपल्या प्रेमकथेची समस्या पोलीस ठाण्यात सांगितली. मागील 4 वर्षांपासून एका तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने तक्रार अर्जात म्हटले आहे. ती मुलगीही याच पोलीस स्टेशन परिसरात राहते. दोघेही भाड्याच्या खोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. मुलगी त्याच्यासोबत बायकोसारखी राहते. पण ती तिच्या घरीही येत राहते.
प्रेयसीविरोधात तरूणाची पोलिसांत धाव तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून तो त्याच्या प्रेयसीला सामाजिक रितीरिवाजांनुसार लग्न करण्यास सांगत आहे. पण ती नेहमीच याबाबत टाळाटाळ करते. 4 वर्षांनंतरही ती माझ्याशी लग्न करण्यास तयार झाली नाही, तेव्हा माझ्या कुटुंबीयांनी माझे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले. दोन्ही पक्षांनी लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. पण लग्नाच्या शेवटच्या क्षणी माझी प्रेयसी या लग्नाच्या आड आली आणि माझे लग्न मोडले.
"ती मला लग्न करू देत नाही, सिंगलच ठेवायचं आहे" पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न मोडल्यामुळे पीडित तरूणाला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे ज्या स्थळासोबत विवाह होणार होता त्यांना देखील रक्कम द्यावी लागत आहे. दुसरीकडे पीडित तरूणाची प्रेयसी अद्याप त्याच्याशी लग्न करायला तयार होत नाही. त्यामुळे ती मला अविवाहित का ठेवू इच्छिते हे मला कळत नाही, असे तरुणाचे म्हणणे आहे. मात्र, तरुणाच्या तक्रारीवरून बेओहरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास सुरू आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"