बिहारमधील बोर्डाच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांमध्ये कविता आणि शायरी लिहिल्या आहेत, काहींनी श्रीरामच्या नावाने चांगले गुण मागितले आहेत. तर एकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे लिहिली आहेत.
काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानुसार, एका विद्यार्थ्याने रामभजन अवधमध्ये ‘एक दिन ऐसा आया..’ लिहिले आणि शेवटी जय श्रीराम असे लिहिले आहे.
ओमिक आणि नॉन ओमिक कंडक्टरमध्ये काय फरक आहे? असा प्रश्न विचारण्यात आला असता उत्तरात, प्रेम पटकन होत नाही, परंतु जेव्हा ते हाेते तेव्हा ते जबरदस्त असते, त्याला नॉन ओमिक असे म्हटले जाते, असे लिहिले आहे. एका विद्यार्थिनीने लिहिले आहे की, जे कोणी माझी कॉपी तपासेल, कृपया मला खूप चांगले गुण द्या. जेणेकरून मी अधिक खंबीर मुलगी होईल. डोक्याला दुखापत झाल्यामुळे मी नीट अभ्यास करू शकले नाही.