शरद गुप्ता -नवी दिल्ली : देशाचे लक्ष भलेही हिमाचल आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुकीकडे असेल; पण उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात होत असलेल्या खतौली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही रंगतदार होत आहे.
येथील मुद्दा वीज, पाणी, रस्ते हा नाही. तर, दहा वर्षांपूर्वीच्या जातीय दंगलीचा आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर भाजपचे आमदार विक्रम सिंह सैनी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. यावेळी भाजपने सैनी यांच्या पत्नी राजकुमारी यांना उमेदवारी दिली आहे. या दंगलीत मारल्या गेलेल्या गौरव या युवकाची आई सुरेश देवी अपक्ष निवडणूक लढवित आहेत.
कवाल या गावात २०१३मध्ये तरुणीची छेडछाडीवरुन दंगल उसळली हाेती. दंगलीत ६० लोकांचा मृत्यू झाला होता. निर्दोष असूनही कुटुंबाला न्यायालयीन लढाई एकट्याने लढावी लागत आहे. त्यामुळे कुटुंबाने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुरेश देवी यांचे पती रवींद्र सिंह म्हणाले.