देशातील '१०० पॉवरफुल'च्या यादीत मोदी नं १, राहुल गांधींसह ED च्या प्रमुखांनाही स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 06:42 PM2023-03-30T18:42:30+5:302023-03-30T18:52:33+5:30

या यादीत काँग्रेस नेते राहुल गांधी १५ व्या क्रमांकावर असून अरविंद केजरीवाल हे १६ व्या स्थानी आहेत

In the list of '100 powerful' in the country Modi No. 1, along with Rahul Gandhi the head of ED | देशातील '१०० पॉवरफुल'च्या यादीत मोदी नं १, राहुल गांधींसह ED च्या प्रमुखांनाही स्थान

देशातील '१०० पॉवरफुल'च्या यादीत मोदी नं १, राहुल गांधींसह ED च्या प्रमुखांनाही स्थान

googlenewsNext

जगभरातील सर्वात श्रीमंत लोकांची, जगभरातील सर्वात प्रभावशाली लोकांची आणि जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची, अभिनेत्यांची यादी प्रकाशित होत असते. त्याचप्रमाणे आता भारतातील टॉप १०० पॉवरफुल्ल व्यक्तींची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेस ग्रुपने ही १०० भारतीयांची यादी प्रसिद्ध केली असून याही यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या नंबरवर आहेत. तर, देशाचे गृहमंत्री अमित शहांचा दुसरा नंबर लागतो. त्यामुळे, मोदींनी पुन्हा एकदा आपला नंबर १ ठेवण्यात यश मिळवल्याचं दिसून येतं. 

या यादीत काँग्रेस नेते राहुल गांधी १५ व्या क्रमांकावर असून अरविंद केजरीवाल हे १६ व्या स्थानी आहेत. या यादीत ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा हे १८ व्या स्थानी आहेत. तर, देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड हे ४ थ्या स्थानावर आहेत. संघ प्रमुख मोहन भागवत (६), मुकेश अंबानी (९), ममता बनर्जी (१३), नीतीश कुमार (१४), टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन (२२), काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (२३) व्या स्थानी आहेत. गौतम अदानी (३३), स्मृति ईरानी (३७), तेजस्वी प्रसाद यादव (४०) व्या स्थानी आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांचे खास असलेल्या काही नेत्यांचा यात समावेश आहे. त्यानुसार, ​​एस जयशंकर (६८), ​नितिन गडकरी (६५), अश्विनी वैष्णव (५२), किरेन रिजिजू (५१)​​ व्या स्थानी आहेत. तर, एनएसए अजीत डोभाल (७८) व्या स्थानी आहेत.  

रणवीर सिंग १०० व्या स्थानी

दरम्यान, शेवटच्या टप्प्यातील नावांची पाहिल्यास ९७ व्या स्थानावर अभिनेत्री दीपिका पादुकोण, ९८व्या नंबरवर लुलु ग्रुपचे चेअरमन यूसुफ अली, ९९व्या क्रमांक वर आलिया भट्ट आणि १०० व्या स्थानी रणवीर सिंग आहे.  
 

Web Title: In the list of '100 powerful' in the country Modi No. 1, along with Rahul Gandhi the head of ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.