नवी दिल्ली - देशातील एकूण मतदारांमध्ये महिलांचे प्रमाण निम्म्यापेक्षा थाेडे कमी आहे. मात्र, मतदान करताना महिला आघाडीवर असतात. काही राज्यांमध्ये तर त्यांनी पुरुषांना बरेच मागे टाकले आहे. अनेक जबाबदाऱ्या सांभाळणारी नारी शक्ती मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यातही अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, माेठ्या आणि अर्थव्यवस्थेत आघाडीवर असलेल्या राज्यांच्या तुलनेत लहान राज्यांमधील महिला कर्तव्यदक्ष आहेत. २०१९च्या लाेकसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीतून ही बाब अधाेरेखित हाेते.
या राज्यांत मतदानात नारीशक्ती आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 08:56 IST