प्रयागराज - उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं असा प्रकार समोर आला आहे जो ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. याठिकाणी एका व्यक्तीनं जास्तीचा आनंद घेण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. २८ वर्षाच्या युवकाचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं. त्यानंतर या युवकाने वियाग्राचा ओवरडोस(Viagra Overdose) घेतला त्यामुळे युवकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
३ महिन्यापूर्वी युवकाचं लग्न झाले होते. त्यानंतर मित्रांनी युवकाच्या पुरुषत्वाला आव्हान देत सेक्स पॉवर वाढवण्यासाठी वियाग्रा औषध घेण्याचा सल्ला दिला. मित्राच्या सल्ल्यानंतर युवकाने २५-३० मिलीग्रॅम वियाग्रा खाण्यास सुरुवात केली. परंतु त्यामुळे काही परिणाम होत नव्हता याची जाणीव झाल्याने युवकाने डोस वाढवला. २५-२० मिलीग्रॅमवरून थेट युवकाने २०० मिलीग्रॅम वियाग्रा खाण्यास सुरुवात केली. औषधाच्या ओवरडोसमुळे युवकाची तब्येत ढासळली.
युवकाचा प्रायव्हेट पार्टमध्ये इतकी ताठरता आली ज्यामुळे २० दिवसानंतरही ते तसेच राहिले. युवकाच्या त्रासाने त्याची पत्नी माहेरी निघून गेली. कसंतरी माहेरच्या लोकांनी समजूत काढून बायकोला परत पाठवलं मात्र तरीही काही जमलं नाही. अखेर युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून बायको परतली. डॉक्टरांनी ऑपरेशन करून युवकाला सामान्य केले. परंतु या कारनाम्यामुळे त्याला नवीन समस्येला आजन्म तोंड द्यावे लागणार आहे.
युवक आता कधीही कुठल्याही बाळाला जन्म देऊ शकणार नाही. कारण युवकाच्या प्रायव्हेट पार्टची ताठरता कधी संपणार नाही. त्यामुळे त्याला सार्वजनिक ठिकाणी जातानाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. प्रयागराजच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये युवकावर उपचार करण्यात येत आहेत. युवकाला या समस्येतून बाहेर काढण्याचं डॉक्टरांसमोर आव्हान बनलं आहे. पेनाइल प्रोस्थेसिस ऑपरेशन करून युवकाला पुन्हा नवजीवन देण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, लवकरच युवक सर्वसामान्य जीवन जगेल आणि पत्नीसोबत पूर्वीसारखे संबंध ठेवू शकेल.
डॉक्टर म्हणाले की, रुग्ण वियाग्राचं सेवन आधीपासून करत होता. लग्नानंतर त्याने डोस वाढवले. त्याचा दुष्परिणाम झाल्याचं दिसून आले. लैंगिक संबंध बनवण्याची त्याची क्षमता संपली असं त्यांनी सांगितले. या प्रकारानंतर डॉक्टरांनी लोकांना आवाहन केले आहे की, वियाग्राचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.