बरेली : प्रवास करताना आजकाल अनेक जण गुगल मॅपची मदत घेतात. आपल्याला जिथे जायचे आहे, तिथे पाेहाेचण्यासाठी ही सेवा अतिशय उपयुक्त ठरते. मात्र, काही वेळा लाेक यामुळे अडचणीत आले. उत्तर प्रदेशात बरेली जिल्ह्यात अशीच घटना घडली. टॅक्सीने जाणाऱ्या तीन प्रवाशांना चुकीचा रस्ता दिसला आणि त्यांचा मृत्यू झाला.
मैनपुरी येथील रहिवासी काैशलकुमार, फर्रुखाबादचे विवेक कुमार आणि अमित कुमार हे एका विवाह समारंभातून रात्री परतत हाेते. बरेलीमार्गे त्यांना गाझियाबाद येथे जायचे हाेते. मॅपवर त्यांना दाखविलेल्या रस्त्यावर एका पुलाचे बांधकाम अर्धवट हाेते. रात्री चालकाला हे लक्षात येईपर्यंत उशीर झाला हाेता. पुलाचा एक भाग २०२२मध्येच पुरात वाहून गेला हाेता. घटना घडल्या नंतर बऱ्याच वेळापर्यंत मदतकार्य सुरु झाले नव्हते.
अर्धवट पुलावर माहिती फलकच नव्हता
त्याला गाडी थांबविता आली नाही आणि ते गाडीसह रामगंगा नदीत थेट २५ फूट उंचीवरून काेसळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार सकाळी काही लाेकांच्या लक्षात आला. या पुलावर काेणत्याही प्रकारचा फलक लावलेला नव्हता, ज्यामुळे पुलाचे काम अर्धवट आहे, हे लक्षात येईल.