शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

ऐकावं ते नवलच! पेट्रोल भरल्यानंतर काढली २ हजारची नोट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने परत घेतलं 'तेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 3:10 PM

2000 note exchange : आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारपासून या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

लखनौ : आरबीआयने २ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवार पासून या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २००० नोटा बदलण्यावरून लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी केले आहे. मात्र, २ हजाराच्या नोटेवरून काही लोकांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे, ज्याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात पाहायला मिळाला. इथे पेट्रोल भरायला आलेल्या व्यक्तीने गाडीत पेट्रोल भरल्यानंतर २ हजाराची नोट काढली अन् पंपावरील कर्मचाऱ्याने जे काही केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. 

ग्राहकाने २ हजार रूपयांची नोट दिल्याने कर्मचाऱ्याने ती घेण्यास नकार दिला. खरं तर ग्राहकाने दुसरी नोट देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पंप कर्मचाऱ्याने त्याच्या गाडीत भरलेले पेट्रोल माघारी घेतले. सध्या या अनोख्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मंगळवारपासून नोटा बदलता येणार लोकांकडे नोटा बदलण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी आहे, असं आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. बाजारात दुसऱ्या नोटांची कमतरता नाही. आरबीआय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. आवश्यक सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत २ हजाराची नोट पुन्हा घेण्याचे ठरवले आहे. सध्या बाजारात असलेल्या २ हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकिंग सिस्टममध्ये येण्याची शक्यता आहे. करन्सी मॅनेटमेंट प्रक्रियेचा भाग म्हणून २ हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. २ हजाराच्या नोटा लीगल टेंडर राहतील असंही आरबीआयने म्हटलं आहे. 

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNote BanनोटाबंदीSocial Viralसोशल व्हायरलPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप