इंदूर : टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद असलेल्या इंदूर येथील ओमप्रकाश केडिया (वय ७२) यांनी जगभरात रामायणावर काढण्यात आलेल्या शेकडो टपाल तिकिटांचा केलेला संग्रह सर्वांचा औत्सुक्याचा व कौतुकाचा विषय बनला आहे.
ओमप्रकाश केडिया मागील साठ वर्षांपासून टपाल तिकिटांचा संग्रह करत आहेत. त्यांनी सांगितले की, भारत, इंडोनेशिया, नेपाळ, लाओस, थायलंड, कंबोडिया आदी देशांनी रामायणावर जारी केलेली तिकिटे माझ्या संग्रहात आहेत.
त्यांनी सांगितले की, आग्नेय आशियातील देशांत रामायण अतिशय लोकप्रिय आहे. त्या देशांत रामायण विविध पद्धतीने सादर केले जाते. रामायणातील भगवान राम, सीता, हनुमान, लक्ष्मण, भरत, जटायु आदी व्यक्तिरेखांशी संबंधित घटनांवर काही देशांनी टपाल तिकिटे जारी केली आहेत. ब्रिटिश राजवटीत भारतातील पोस्टकार्डांवर रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्रे छापण्यात येत असत. केडिया यांच्या संग्रहात ती पोस्टकार्डही आहेत.